दादर पूर्वेतील एका गेस्टहाऊसच्या खोलीत अमली पदार्थाची डिलीव्हरी देण्यासाठी आलेल्या दोन जणांना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९च्या पथकाने अटक केली आहे. या दोघीजवळून जवळपास १० कोटी ८ लाख रुपये किंमत असलेला एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.अटक करण्यात आलेले दोघेही पूर्व उपनगरातील गोवंडी येथील रहिवासी आहेत. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली असून या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना गुप्त बातमीदाराकडून अमली पदार्थ संदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे दया नायक आणि त्यांच्या पथकाने बोगस ग्राहक तयार करून या ड्रग्स विक्रेत्याकडे एमडी या अमली पदार्थाची मागणी करण्यात आली. हे अमली पदार्थ दादर येथील एका हॉटेलमध्ये मागविण्यात आले होते.
हे ही वाचा:
२७० किलोचा बार मानेवर पडल्याने १७ वर्षीय पॉवर लिफ्टरचा मृत्यू!
मुंब्र्याला उतरता आले नाही म्हणून शेख जिया हुसेनचा चाकू हल्ला
महाकुंभ: महिलांच्या स्नानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलिसांकडून गुन्हा दाखल!
विजेंदर गुप्ता विधानसभेचे नवे अध्यक्ष होणार
गुन्हे शाखेने दादर पूर्व येथील समर लँड गेस्ट हाऊस या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी एक खोली बुक केली होती.
बुधवारी रात्री ड्रग्स विक्रेते हे ड्रग्सची डिलीव्हरी घेऊन गेस्ट हाऊसच्या खोलीवर येताच दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी एमडी या दड्रग्ससह दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १०.०८ कोटींचा एमडी हा ड्रग्स जप्त करण्यात आला. सेनुल जुलुम शेख (२८),जगनकीर शाह आलम शेख (२९) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे गोवंडी शिवाजी नगर परिसरात राहणारे आहेत. मागील काही महिन्यांपासून हे दोघे अमली पदार्थ पोहोचवण्याचे काम करीत होते. अमली पदार्थ विक्रीचे हे मोठे रॅकेट असून या रॅकेटचा सूत्रधार फरार झाला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.