धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाने चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तरुणाने तीन जणांवर हल्ला केला असून यात तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले असून त्याचे नाव शेख जिया हुसेन असे आहे.
कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये ही चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. मुंबईत राहणारा १९ वर्षीय शेख जिया हुसेन नावाच्या तरुणाने रागाच्या भरात चाकूने तीन प्रवाशांवर हल्ला केला. अक्षय वाघ, हेमंत काकरिया, राजेश चांगलानी असे जखमी प्रवाशांची नावे आहेत. कल्याणवरून दादरला जाणाऱ्या ९.४७ च्या जलद लोकलमध्ये ही घटना घडली. धक्का लागण्यावरून झालेल्या किरकोळ वादानंतर हुसेनने थेट चाकू काढून प्रवाशांवर वार केले. यानंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या त्याची चौकशी करण्यात येत आहे.
हे ही वाचा..
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी धोक्यात? न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा
महाकुंभ मेळ्याबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या १०१ अकाउंट्सवर कारवाईचा बडगा
महाकुंभ: महिलांच्या स्नानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलिसांकडून गुन्हा दाखल!
कर्नाटकमध्ये काश्मिरी विद्यार्थ्याचे रॅगिंग
माहितीनुसार जलद लोकल ही कल्याणहून दादरच्या दिशेने निघाली होती. सकाळी कामावर जाण्याचा वेळ असल्याने ट्रेनला गर्दी होती. दरम्यान, हल्लेखोर तरुण शेख जिया हुसेन याला मुंब्रा स्थानकात उतरायचे होते. मात्र, त्याला उतरायला जागा मिळत नव्हती आणि ट्रेन मुंब्रा स्थानकात थांबत नाही हे समजताच त्याने दरवाजाच्या दिशेने जाण्यासाठी इतर प्रवाशांना धक्का देण्यास सुरुवात केली. यावरून किरकोळ वादाला सुरुवात झाली आणि त्याने अचानक चाकूने हल्ला केला. यात तीन प्रवासी जखमी झाले.