‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मना नोटीस बजावली आहे. या सूचनेत, या प्लॅटफॉर्मना आचारसंहितेचे पालन करण्याचे कठोर निर्देश देण्यात आले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी एक्सवर पोस्ट केले आहे की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट प्रकाशकांना आणि OTT प्लॅटफॉर्मच्या स्वयं-नियामक संस्थांना भारताच्या कायद्यांचे आणि माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया, नीतिमत्ता संहिता) नियम, २०२१ मध्ये नमूद केलेल्या नीतिमत्तेचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्यासाठी एक सल्लागार जारी केला आहे.
ऑनलाइन क्युरेटेड कंटेंट (OTT प्लॅटफॉर्म) आणि सोशल मीडियाच्या काही प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या अश्लील कंटेंटच्या कथित प्रसाराबाबत संसद सदस्यांकडून, वैधानिक संस्थांकडून प्रतिनिधींकडून आणि सार्वजनिक तक्रारींकडून मंत्रालयाला संदर्भ मिळाले आहेत, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे. नैतिकतेच्या संहितेनुसार OTT प्लॅटफॉर्मने कायद्याने प्रतिबंधित असलेली कोणतीही कंटेंट प्रसारित करू नये. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी करण्याची गरज आहे, अशी टिपण्णी केल्यानंतर आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नियमनाच्या अभावाचा गैरवापर युट्युबर्स करत असल्याचे सांगितल्यानंतर केंद्राने हे पाऊल उचलले आहे.
हे ही वाचा :
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची आमदारकी धोक्यात? न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा
बीरभूम बॉम्बस्फोट : टीएमसी नेता बबलू मोंडलला १० वर्षांची शिक्षा
अमेरिकेतून हद्दपार झालेल्यांच्या यादीत पंजाबचा माणूस, अद्याप परतलेला नाही; कुटुंबाशी संपर्क नाही!
महाकुंभ मेळ्याबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या १०१ अकाउंट्सवर कारवाईचा बडगा
युट्युब प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये केलेल्या बेताल विनोदाबद्दल त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर एकत्र करण्याची मागणी करणाऱ्या युट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले होते. या कार्यक्रमादरम्यान रणवीर याने एका स्पर्धकाला आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर या मुद्दा अधिक पेटून उठला असून याविरोधात तक्रार देखील करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे सर्व भाग युट्युबवरून काढून टाकण्यात आले आहेत. तर, अलाहबादियाविरुद्ध आतापर्यंत तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यातील एक आसाममध्ये, दुसरे मुंबईत आणि सोमवारी जयपूरमध्ये त्याच्याविरुद्ध नवीन एफआयआर दाखल करण्यात आले.