दै. सामनाचे दिल्ली ब्युरो चीफ पत्रकार नीलेशकुमार कुलकर्णी यांनी भारतीय राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लिहिलेल्या ‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी झाले. ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम झाला.
देशाच्या लोकशाहीचा प्रवास या पुस्तकात चितारण्यात आला आहे. संसद भवनाचा इतिहास, ऐतिहासिक घटनाक्रम, संसदेतील ऐतिहासिक भाषणे, पंतप्रधानांनी देशासाठी दिलेले योगदान, पंतप्रधान निवडीवेळी रंगलेले राजकारण, लोकसभा सभापतींनी उमटवलेला ठसा, महाराष्ट्रातील राजकारण्यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात पाडलेली कार्यकर्तृत्वाची छाप, संसदेतील काही हळुवार मिश्कील प्रसंग, काही कटू प्रसंग या पुस्तकात रेखाटण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशनंतर आता गोव्यातही ‘छावा’ सिनेमा करमुक्त!
महाकुंभ मेळ्याबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्या १०१ अकाउंट्सवर कारवाईचा बडगा
विजेंदर गुप्ता विधानसभेचे नवे अध्यक्ष होणार
दादर पूर्वेतील एका हॉटेलमधून जप्त केले १० कोटींचे अमली पदार्थ
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर पंजाबचे कृषि सचिव अजित जोशी, लक्ष्मीकांत खाबिया हेदेखील उपस्थित होते.
या पुस्तकासाठी संजय राऊत यांची प्रस्तावना असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या पुस्तकात अभिप्राय लिहिला आहे. पुण्याच्या अनासपुरे पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.