छत्रपती संभाजी महाराजांवर आधारीत ‘छावा’ चित्रपटाची देशभरात जोरदार चर्चा आहे. चित्रपटाने २०० कोटींचा आकडाही पार केला आहे. अभिनेता विकी कौशलचा चित्रपटातील अभिनय पाहून सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर झालेला अत्याचार, महाराजांनी सोसलेल्या यातना अभिनेत्याने हुबेहुबे सादर करण्याचा प्रयत्न केला.
चित्रपटातील अनेक अशी दृश्ये आहेत जी मने हेलावून टाकणारी आहेत. ही दृश्ये पाहून प्रेक्षकांनी डोळ्यात पाणी आणले. अनेकजण चित्रपटगृहात, चित्रपटगृहाबाहेर येवून ढसाढसा रडले. अनेकांनी चित्रपट गृहात शिवगर्जनाही दिली. सर्व स्तरावरून ‘छावा’ चित्रपटाचा गाजा-वाजा असताना अभिनेत्री स्वरा भास्करने आपले ज्ञान पाजळण्याचे काम केले होते. यावरून भाजपाच्या महिला आमदार चित्रा वाघ यांनी प्रत्युतर देत तुमच्या सारख्या मुर्दाड मनाच्या लोकांची आता कीव येत असल्याचे म्हटले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, स्वरा भास्कर यांना कुठे काय बोलायचं याचं तारतम्य उरलं नाही हे नक्की. दिल्लीमध्ये चेंगराचेंगरी होऊन दुर्दैवी मृत्यू झाले ही घटना खरंच क्लेशदायक होती आणि आहे. पण त्या घटनेचा आमच्या राजाशी सांगड घालण्याची काहीही गरज नव्हती.
त्या पुढे म्हणाल्या, स्वरा भास्कर आमचे छत्रपती संभाजी राजे हे काल्पनिक नव्हते त्यांच्यावरती क्रूर अत्याचार करणारा औरंग्या देखील काल्पनिक नव्हता हे तर तू मान्य करशीलच. त्यामुळेच आमच्या राजावरती होणारे अत्याचार पाहून प्रत्येक संवेदनशील मनाला त्रास झाला आणि त्या औरंग्याचा प्रचंड राग आला.
त्यामुळेच प्रत्येक भारतीयाला हा इतिहास समजायलाच हवा जो तुमच्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या लोकांनी सोयीने बदलला. आजही जेव्हा सत्य समोर येतंय खरा इतिहास लोकांना कळतोय तेव्हा तुम्हाला आणि तुमच्यासारख्या अनेकांना पोटशूळ का होतोय? हे समस्त भारतीयांना चांगलंच उमगलय. त्यामुळेच आमच्या महाराजांबद्दल गरळ ओकणं बंद कर, तुमच्या सारख्या मुर्दाड मनाच्या लोकांची आता कीव येऊ लागली आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.
हे ही वाचा :
‘संसद भवन ते सेंट्रल विस्टा’ पुस्तकाचे प्रकाशन
ओटीटी प्लॅटफॉर्मना इशारा, आचारसंहितेच्या नियमांचे पालन करा नाहीतर…
२७० किलोचा बार मानेवर पडल्याने १७ वर्षीय पॉवर लिफ्टरचा मृत्यू!
मध्य प्रदेशनंतर आता गोव्यातही ‘छावा’ सिनेमा करमुक्त!
दरम्यान, स्वरा भास्करने एक पोस्ट करत म्हटले होते, “चेंगराचेंगरी व गैरव्यवस्थापनामुळे भयानक मृत्यू होतात. ते मृतदेह जेसीबी बुलडोझरने काढले जात असल्याचा आरोप होतो. यापेक्षा, जो समाज चित्रपटात दाखवलेला ५०० वर्षापूर्वीच्या हिंदूंचा छळ पाहून भावुक होतो, तो समाज बुद्धीने आणि आत्म्याने मृत पावलेला समाज आहे”.