30 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरविशेषबदायु दुहेरी हत्याकांडातील धक्कादायक तपशील समोर

बदायु दुहेरी हत्याकांडातील धक्कादायक तपशील समोर

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील बदाऊनच्या बाबा कॉलनीत साजिद आणि त्याचा भाऊ जावेद यांच्या हातून आयुष आणि अयानच्या निर्घृण हत्येनंतर अनेक नवीन नवीन बाबी समोर येऊ लागल्या आहेत. या परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, आरोपीच्या कुटुंबाची या परिसरात सलून व्यवसायाची मक्तेदारी आहे आणि त्यांची अशी अकरा दुकाने आहेत. शिवाय, स्थानिकांनी असे सांगितले आहे की साजिदच्या कुटुंबातील सर्व दुकाने त्याने घृणास्पद गुन्हा करण्याच्या काही तास आधी बंद केली होती. लोकांनी त्याच्या वडिलांवर जावेदच्या ठावठिकाणाबद्दल अधिकाऱ्यांना फसवल्याचा आरोप केला आहे.

गुन्ह्याच्या ठिकाणाजवळ राहूनही त्यांना या घटनेची खूप नंतर जाणीव झाल्याचे लोकांनी सांगितले. स्थानिक रहिवाशांनी सांगितले कि, हत्येच्या दिवशी गुन्हेगारांच्या कुटुंबाने त्यांची दुकाने खूप आधी बंद केली होती. त्यांची दुकाने साधारणपणे संध्याकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत सुरू असतात, परंतु त्यादिवशी ती सर्व बंद करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडामागे मोठा कट असल्याचे स्थानिकांनी सांगितले आणि साजिदच्या कुटुंबियांना आधीच माहिती होती. त्यांनी हे देखील उघड केले की साजिदच्या कुटुंबाला २० वर्षांपूर्वी उपरायातील एका गावातून बेदखल करण्यात आले होते, त्यानंतर ते सखानू परिसरात स्थायिक झाले होते.

हेही वाचा..

राहुल गांधींची भूमिका इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या भूमिकेशी विसंगत

डीपफेक प्रकरणी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना हवीय घसघशीत नुकसान भरपाई!

“आमच्याकडे दोन रुपयेही नाहीत” बँक खाती गोठवल्यानंतर काँग्रेसची रडारड

चॅट जीपीटी म्हणतं, यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि मुंबईचा संघ चमकणार

साजिदच्या दुकानातील काही ग्राहकांनी सांगितले की,त्यांना सुरुवातीला त्याच्या वागण्याची भीती वाटत नव्हती. गुन्ह्याच्या वेळी जावेद मृताच्या घराबाहेर दुचाकीवर थांबला असताना साजिदने लहान मुलांवर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचे त्यांनी उघड केले. या प्रकरणात साजिद आणि जावेदचे वडील बाबू यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले की बाबूने दावा केला की साजिद गुन्हा घडला तेव्हा जावेदच्या जागी तो घटनास्थळी उपस्थित होता.साजिद आणि जावेदने भाड्याने घेतलेल्या स्टोअरच्या बाहेरील टाइल्समध्ये हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा आहेत. स्थानिकांनी सांगितले की ते केवळ दिखाव्यासाठी आहे आणि त्यांच्या मनात इतर गोष्टी आहेत. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की दोघे सण आणि इतर प्रसंगी लोकांमध्ये सामील होत असत. त्यांनी हा खून एक कट असल्याचा पुनरुच्चार केला आणि या जोडीला दहशतवादी म्हणून लेबल लावले.

गेल्या पाच-सहा वर्षात साजिद आणि जावेद इतका घृणास्पद गुन्हा करतील अशी कधीही कल्पना आली आणि किंवा तसे कधी वाटले नाही. या प्रकरणातील दोषींवर प्रशासनाकडून कडक कारवाईची मागणी स्थानिक करत आहेत. बदायूंमध्ये सलूनची दुकाने चालवणाऱ्या साजिद आणि जावेदने १९ मार्चच्या संध्याकाळी आयुष आणि अहान उर्फ ​​हनी या दोन हिंदू मुलांची हत्या केली. हत्येनंतर साजिद घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याच दिवशी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा झाला. जावेदने बरेली येथे आत्मसमर्पण केले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आरोपींनी पीडितेचा भाऊ पियुष यालाही मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो जखमी होऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा