31 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरविशेषश्रेयस तळपदेचे हृदय चक्क १० मिनिटे थांबले होते!

श्रेयस तळपदेचे हृदय चक्क १० मिनिटे थांबले होते!

अभिनेता बॉबी देओल याची माहिती

Google News Follow

Related

श्रेयस तळपदेला गुरुवार, १४ डिसेंबर रोजी जेव्हा हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. दरम्यान श्रेयसला जेव्हा हृदयविकाराचा झटका आला होता तेव्हा त्याचे हृदय १० मिनिटांसाठी थांबले होते, असे श्रेयसचा मित्र आणि अभिनेता बॉबी देओल याने सांगितले आहे. त्याला श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदे यांनी माहिती दिली होती. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बॉबी देओलने ही माहिती दिली आहे.

हेही वाचा..

पोप फ्रान्सिसचे माजी सल्लागार कार्डीनल अन्जेलो बेक्यूना तुरुंगवासाची शिक्षा

मोदींनी सूरतला नवा पैलू पाडला; विश्वविक्रमी डायमंड बोर्सचे उद्घाटन!

युद्धसमाप्तीनंतर गाझामध्ये ‘नागरी सरकार’ची स्थापना

नागपूर; सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट, ९ जणांचा मृत्यू!

बॉबी देओल म्हणाला कि, आपण नुकतेच श्रेयस याच्या पत्नीशी बोललो. ज्यावेळी श्रेयसचे हृदय १० मिनिटांसाठी बंद होते तेव्हा दीप्ती तळपदे या खूप अस्वस्थ होत्या. मुंबईमधील अंधेरी परिसरात असलेल्या बेलेव्ह्यू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. गुरुवारी रात्री १० वाजता श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. आणखी एक गोष्ट जी तुम्हाला कदाचित माहित नसेल ती म्हणजे बॉबी देओल आणि श्रेयस तळपदे हे ऑफस्क्रीन जवळचे मित्र आहेत, त्यांचा वाढदिवसही एकाच दिवशी येतो.

श्रेयस तळपदे ‘पोस्टर बॉय’मध्ये दिसला होता. या चित्रपटात बॉबी देओल आणि सनी देओल देखील मुख्य भूमिकेत होते. मात्र हा चित्रपट पडद्यावर कमाल दाखवू शकला नाही.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा