28 C
Mumbai
Wednesday, February 25, 2026
घरविशेषअतिवृष्टीग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून १० कोटींची मदत जाहीर!

अतिवृष्टीग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून १० कोटींची मदत जाहीर!

कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठींची घोषणा

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पुरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांचं व नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

या पार्श्वभूमीवर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी माहिती देताना सांगितले की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी ट्रस्टकडून तातडीने १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. महाराष्ट्रावर संकटाचं सावट आलं की, ट्रस्ट नेहमीच पुढे येऊन मदतीसाठी उभा राहिला आहे. आता पुन्हा एकदा या निर्णयामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा : 

अतिवृष्टीग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून १० कोटींची मदत जाहीर!

बरेली हिंसाचार: मुख्य कट रचणाऱ्यांपैकी एक नदीम खान पोलिसांच्या ताब्यात!

लेहमधील अशांततेचा लडाख पर्यटनाला फटका!

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा: परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ!

दरम्यान, राज्यातील काही भागात अजूनही काही भागात पाऊस जोर धरून आहे. बचाव पथकाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेले गेले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यातून शेतकर्‍यांचे झालेले प्रचंड नुकसान यांना मदत म्हणून अनेक संस्था, नेते, नागरिक पुढे येवून रक्कम-जीवनावश्यक साहित्य देत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा