30.1 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषपंजाबमध्ये योगी आदित्यनाथ असते तर गुन्हेगारी संपली असती!

पंजाबमध्ये योगी आदित्यनाथ असते तर गुन्हेगारी संपली असती!

सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी भाषणात केले वक्तव्य

Google News Follow

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या स्मृतिदिनी त्याचे पिता बलकौर सिंग यांनी पंजाबमधील वाढत्या गुन्हेगारीवर टीका करतानाच इथे योगी आदित्यनाथ असते तर चित्र बदलले असते अशी टिप्पणी केली आहे. पंजाबमध्ये जर योगी आदित्यनाथ असते तर आपला पुत्र मारला गेला नसता असे त्यांनी म्हटले आहे.

सिद्धू मुसेवालाच्या स्मृतिदिनी मनसा गावात प्रचंड गर्दी जमली होती. एक लाख लोक येतील अशी शक्यता व्यक्त होत असताना १० हजारांची गर्दी तिथे झाली होती. त्यावेळी बलकौर सिंग यांनी पंजाबमधील आम आदमी पार्टी सरकारवर टीका केली. पंजाबमध्ये गँगस्टरना अच्छे दिन आलेत असे विधान करत उत्तर प्रदेशात मात्र या गुन्हेगारांना संपवले जात आहे, असे ते म्हणाले.

बलकौर सिंग म्हणाले की, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ उत्तम काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेशात चांगले यश मिळेल. तिथे योगी आदित्यनाथ लक्षणीय काम करत आहेत.

हे ही वाचा:

प्रकाश सुर्वे यांचा बॅनर काढल्यावरून भाजपा कार्यकर्त्याला मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

लंडनमध्ये भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्याने खलिस्तानी समर्थकांना शिकवला धडा

हा मावळा तुमच्यासारखा सत्तेसाठी कधी मिंधा झाला नाही, होणार नाही

‘सावरकर समझा क्या, नाम राहुल गांधी है’ यावरून राहुल गांधी निशाण्यावर

बलकौर म्हणाले की, मी तर लहान माणूस होतो पण माझ्या घरापर्यंत हे गुंड शिरले. यात सरकारचाही दोष आहे. पण इथे योगी आदित्यनाथ यांचे सरकार असते तर असे झाले नसते. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या कामामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना मतदान करण्यास लोक प्रवृत्त होतील.

बलकौर यांनी ११ महिने झाले तरी आपल्याला न्याया मिळालेला नाही असे सांगितले.

या कार्यक्रमात खलिस्तानी समर्थक अमृतपालचे समर्थकही उपस्थित होते. त्यात भारत स्वतंत्र आहे की गुलाम अशी विचारणाही मुसेवालाची आई चरण कौर हिने केल्यावर लोकांनी गुलाम असा आवाज दिला. खलिस्तान जिंदाबादच्या घोषणाही यावेळी दिल्या गेल्या.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा