33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषसिद्धू मूसवालाची आई ५८ व्या वर्षी गरोदर

सिद्धू मूसवालाची आई ५८ व्या वर्षी गरोदर

Google News Follow

Related

पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची आई आपल्या वयाच्या ५८ व्या वर्षी पुन्हा आई होणार आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ति सध्या गरोदर आहे. चरणसिंग असे तिचे नाव आहे. मार्चमध्ये ती बाळाला जन्म देईल. सिद्धू मुसावला याची मे २०२२ मध्ये हत्या झाली होती. सध्या चरणसिंग ही वैद्यकीय देखरेखेखाली आहे.

सिद्धू मूसेवाला यांची मे २०२२ मध्ये पंजाबच्या मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तो त्याच्या चुलत भाऊ आणि मित्रासह मूळ गाव मूसापासून १० किमी अंतरावर असलेल्या मानसातील जवाहरके गावात जीपमधून जात असताना सहा शुटरनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्याच्या मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास पंजाब पोलिसांचे विशेष तपास पथक करत आहे. टीमने लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि जग्गू भगवानपुरिया यांच्यासह 32 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा..

संदेशखलीचा आरोपी शाहजहान शेखला फाईव्ह स्टार सुविधा

अवैध खाण प्रकरणी अखिलेश यादव यांना सीबीआयकडून समन्स!

राजीव गांधींच्या मारेकऱ्याचा चेन्नईच्या रुग्णालयात मृत्यू!

देवेंद्र फडणवीसांच्या टीकास्त्रानंतर मनोज जरांगेंनी मागितली माफी

मानसा येथे सिद्धू यांच्या स्मरणार्थ कँडल मार्च काढण्यात आला होता. दिवंगत सिद्धू याचे चाहते त्याच्यासाठी न्याय मिळविण्यासाठी मोसा गावात मेणबत्ती मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते. या मोर्चात सिद्धूच्या आईचीही उपस्थिती होती. सिद्धूच्या स्मरणार्थ जवाहर के गावातील गुरुद्वारामध्ये प्रार्थना करण्यात आली होती. २०२२ मध्ये दिलजीत दोसांझने मूसवालाच्या पालकांबद्दल आणि त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना कसे त्रास होत असावे याबद्दल सांगितले. यापूर्वीही अनेकदा कलाकारांची हत्या कशी झाली आहे, हेही त्यांनी सांगितले.

दिलजीतने दिलेल्या एका मुलाखातीत मुसवाला आणि दीप सिद्धू यांच्या बद्दल सांगितले आहे. तो म्हणतो, त्या सर्वांनी खूप मेहनत घेतली. मला वाटत नाही की एखादा कलाकार कोणाचेही वाईट करू शकतो, मी माझ्या स्वतःच्या अनुभवाबद्दल बोलत आहे. त्याच्यात आणि इतरांमध्ये काहीही असू शकत नाही. मग कोणी दुसऱ्याला का मारेल? ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्याबद्दल बोलणे देखील खूप कठीण आहे. तुम्हाला फक्त एक मूल आहे आणि तो मरण पावला. त्याचे वडील आणि आई, ते कसे जगत असतील. ते कशातून जात आहेत याची तुम्ही कल्पना करू शकत नाही, फक्त त्यांनाच माहीत आहे, असेही तो म्हणाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा