28.9 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरविशेषसलमान खानला साप चावला

सलमान खानला साप चावला

Google News Follow

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला सापाने दंश केल्याचे वृत्त आहे. शनिवारी २५ डिसेंबरला रात्री ही घटना घडली. सलमान खान याला त्याच्या फार्म हाऊसवर सापाने दंश केला. त्यानंतर सलमान खानला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

सलमान खान हा नाताळ आणि त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर गेला होता. सोमवारी २७ डिसेंबरला सलमानचा वाढदिवस असतो त्यानिमित्त सलमान आणि त्याचे जवळचे मित्र मंडळी पनवेलच्या फार्म हाऊसवर गेले होते. त्यानंतर शनिवारी रात्री उशिराच्या सुमारास सलमानला सापाने दंश केला.

हे ही वाचा:

आयआयटी कॅम्पसमध्ये ऑफर्स कोटी कोटी

गेले सांता कुणीकडे?

… म्हणून गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा नाकारला अंगरक्षक

रेल्वे स्थानकासमोर विकत होते गांजा; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

शनिवारी मध्यरात्री सलमान खान फार्म हाऊस बाहेर पडला होता. त्याच वेळी त्याच्या पायाला सापाने दंश केला. सापाने दंश केल्याचे समोर आल्यानंतर तातडीने प्राथमिक उपचारानंतर कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सलमान खानला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. साप बिनविषारी असल्याने सलमानवरील मोठे संकट टळले. आता सलमानची प्रकृती ठीक असल्याचे वृत्त आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा