28.9 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषरेव्ह पार्टीमध्ये सापांची व्यवस्था गायक फाझिलपुरियाने केली!

रेव्ह पार्टीमध्ये सापांची व्यवस्था गायक फाझिलपुरियाने केली!

एल्विश यादवचा दावा

Google News Follow

नोएडा येथील रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाच्या वापर केल्याप्रकरणी आणखी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पार्टीत सापाची व्यवस्था गायक फाझिलपुरियाने केली होती, अशी माहिती युट्युबर आणि बिग बॉसचा ओटीटी २ विजेता एल्विश यादवने पोलिसांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

एल्विश यादवचे दोन सापांसोबतचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. फाझिलपुरिया हा हरियाणाचा गायक युट्युबर एल्विश यादवसोबत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. नोएडा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या यादवने पोलिसांना सापांची व्यवस्था गायक फाझिलपुरिया याने केल्याचा दावा केला आहे.वन्यजीव संरक्षण कायदा आणि गुन्हेगारी कट या दोन गुन्ह्यांखाली दाखल एफआयआरमध्ये एल्विश यादव याच्यासह सहा जणांची नावे आहेत. या पार्टीतून नऊ सापांची मुक्तता करण्यात आली होती. वन्यजीव विभागाने केलेल्या तपासात या नऊ सापांच्या विषग्रंथी गायब होत्या.

हे ही वाचा: 

‘भिवंडीतील पडघा हे गाव सीरियासारखे! शरियाचे होते पालन…’

बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!

घरकाम करणाऱ्या बाईच्या बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनी धावून आली!

निवडणुकीपूर्वीच बीआरएसचे केटीआर राव गडगडले

नोएडातील सेक्टर ५१ मधील बँक्वेट हॉलमधून ३ नोव्हेंबरला पाच जणांना अटक करण्यात आली होती. तसेच, पाच कोब्रासह नऊ सापांची मुक्तता करण्यात आली होती. तसेच, २० मिलि सापाचे विषही यावेळी ज्त करण्यात आले होते. तेव्हा यादव पार्टी हॉलमध्ये उपस्थित नव्हता. मात्र या सापाच्या विषाचा अमली पदार्थांसारखा वापर केला जात होता का, या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा