30 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरविशेषपहलगाम हल्ल्यासाठी सपा नेते पाकिस्तानला क्लीन चिट देतायेत!

पहलगाम हल्ल्यासाठी सपा नेते पाकिस्तानला क्लीन चिट देतायेत!

भाजपा नेता शहजाद पूनावाला यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

Google News Follow

Related

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत समाजवादी पक्षाचे नेते लाल बिहारी यादव यांनी एक विधान केले होते. आता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “सर्वपक्षीय बैठकीनंतर, एकामागून एक काँग्रेस नेते, राजद नेते आणि आता सपाचे नेते पाकिस्तानला क्लीन चिट देत आहेत.

रॉबर्ट वाड्रा यांनी तर सुरवातीलाच म्हटले होते कि, हे हिंदुत्ववाल्यांनी केले आहे. सपाचे नेते म्हणत आहेत की हा (पहलगाम हल्ला) राजकीयदृष्ट्या घडला होता. सपाचे राम गोपाल यादव यांनीही एकदा म्हटले होते की पुलवामा हल्ला मतांसाठी करण्यात आला होता. याचा अर्थ त्यांनी पाकिस्तानला क्लीन चिट दिली आहे आणि ते सुरक्षा दलांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करत आहेत. इंडी आघाडी आणि काँग्रेसची भाषा एकच असून ही इंडी आघाडी रावळपिंडी बनून पाकला क्लीन चिट देत आहे.

याआधी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पहलगाम मुद्द्यावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, ‘ही बाहेरून काँग्रेस कार्यकारिणी आहे आणि आतून पाकिस्तान कार्यकारिणी आहे.’ दररोज एक नेता येऊन पाकिस्तानच्या समर्थनार्थ बोलतो. दहशतवादी हल्ल्यापासून दररोज, सैफुद्दीन सोझ बोलतात की, आपण हे प्रकरण स्वीकारले पाहिजे. आपण पाणी बंद केले नाही पाहिजे. सिद्धरामय्या यांचे रडगाणे सुरु झाले आहे. तर राहुल गांधींचे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

हे ही वाचा : 

आवडले म्हणून बापन शेखने बायकोचे नाकच चावून गिळले

पुंछमध्ये दरीत बस कोसळून २ ठार, ४० जखमी

कडूलिंबाची फुलंही औषधी!

हेटमायर बाहेर, शाई होपकडे पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी!

संबित पात्रा पुढे म्हणाले, ‘अलिकडच्या मुलाखतीत मी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना असे म्हणताना ऐकले की काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने अटारी सीमा ओलांडली आणि १५ दिवस पाकिस्तानात राहिले. पकडले जाऊ नये म्हणून, त्याने कोणतेही उड्डाण घेतले नाही. काँग्रेस नेता १५ दिवस इस्लामाबादमध्ये राहिला आणि त्यांची मुले देखील भारतातील रहिवासी नाहीत.

तसेच पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटले होते की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कधीही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले नाहीत. पाकिस्तानी दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानी सैन्याला ऑक्सिजन देण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नाही, असे संबित पात्रा म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा