अहमदाबादमधील विमान अपघात दुर्घटनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात एक प्रवासी जिवंत असल्याचे समोर आले आहे. दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडीओ पाहून विमानातील प्रवासी जिवंत असल्याची शक्यता नाकारली जात होती. याच दरम्यान, एक प्रवासी बचावला असल्याचे समोर आले आहे. अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक यांनी एएनआयशी संवाद साधताना ही माहिती दिली. बचावलेल्या प्रवाशावर सध्या उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, एएनआयशी फोनवरून बोलताना अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक म्हणाले, “पोलिसांना सीट क्रमांक ११ए मध्ये एक प्रवासी जिवंत सापडला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या संख्येबद्दल अद्याप काहीही सांगता येत नाही. विमान निवासी भागात कोसळले असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.” दरम्यान, मिडियाच्या बातमीनुसार, रमेश विश्वासकुमार असे बचावलेल्या प्रवाशाचे नाव असून त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
हे ही वाचा :
आले आले पाकिस्तानचे कमाईचे दिवस आले…
अहमदाबाद विमान अपघातावर भारतीय क्रिकेटपटूंकडून शोक व्यक्त!
विमान अपघात : एअर इंडियाचे सोशल मीडिया हँडल्स, वेबसाईट ‘ब्लॅक’
दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही, फोटो आला समोर!
एअर इंडिया विमान अपघाताच्या मुद्द्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू म्हणाले – “आम्ही या घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करणार आहोत. त्यानुसार ही घटना कशी घडली हे आम्हाला कळेल. या दुःखद आणि भयानक घटनेने मी पूर्णपणे हादरलो आहे. मी अजूनही धक्क्यात आहे.
या दुर्घटनेत भाजपा नेते विजय रुपाणी यांचा देखील समावेश होता, हे जाणून मला खूप दुःख झाले आहे. यावेळी, मी फक्त प्रवाशांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल विचार करतोय. अनेक एजन्सी बचाव कार्यात गुंतल्या आहेत. आम्ही शक्य तितक्या सर्व प्रकारे मदत करत आहोत.”







