“वंदे मातरम्”वरील चर्चेसाठी संसदेत विशेष चर्चासत्र; पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार?

गुरुवार किंवा शुक्रवारी लोकसभेत या मुद्द्द्यावर चर्चा होण्याची शक्यता

“वंदे मातरम्”वरील चर्चेसाठी संसदेत विशेष चर्चासत्र; पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार?

संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार, १ डिसेंबर पासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (SIR) वर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली. चर्चेअभावी पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात गोंधळ झाला आणि विरोधी खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. दरम्यान, केंद्र सरकारने या आठवड्यात संसदेत वंदे मातरम वर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

माहितीनुसार, सरकार गुरुवार किंवा शुक्रवारी लोकसभेत या मुद्द्द्यावर चर्चा होऊ शकते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या चर्चेसाठी १० तासांचा वेळ दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या चर्चेत सहभागी होतील अशी शक्यता आहे. यासंबंधीचे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे. “वंदे मातरम्”च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एक विशेष चर्चा आयोजित केली जाईल. या आठवड्यात गुरुवार किंवा शुक्रवारी लोकसभेत ही चर्चा १० तासांच्या वेळेसह होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या विशेष चर्चेत सहभागी होतील. या चर्चेत स्वातंत्र्यलढ्यातील या प्रेरणादायी गाण्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले जाईल.

हे ही वाचा:

डिजिटल अरेस्टच्या सर्व प्रकरणांची चौकशी करा, बँकांची भूमिका देखील तपासा!

हिवाळी अधिवेशन: पहिल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी लोकसभेत मांडली ‘ही’ दोन विधेयके

‘उमीद’वर वक्फ मालमत्तेची माहिती अपलोड न केल्यास भरावा लागणार दंड!

दिल्ली स्फोट: आरोपी डॉ. शाहीनच्या घरी एनआयएची छापेमारी

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ३० नोव्हेंबर रोजी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत तसेच लोकसभा आणि राज्यसभेच्या व्यवसाय सल्लागार समित्यांच्या (बीएसी) बैठकांमध्ये या प्रस्तावावर सहमती झाली. सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांनी राज्यसभेतही या प्रस्तावाचे जोरदार समर्थन केले. सरकारने याला राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणून सर्व पक्षांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. एनडीए सदस्यांनी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा व्हावी यासाठीही समर्थन केले.

Exit mobile version