24 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरविशेषहसरंगाने भारताला रडवले...टी२० मालिकेवर लंकेची मोहर

हसरंगाने भारताला रडवले…टी२० मालिकेवर लंकेची मोहर

Google News Follow

Related

भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेचे अखेरच्या सामन्यात श्रीलंकन संघाने विजय मिळवला आहे बर्थडे बॉय वानिंदु हसरंगा याच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर भारतीय संघ ढेपाळला. या विजयासह श्रीलंकेने टी२० मालिका २‐१ अशी खिशात घातली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सुरु असलेल्या टी२० मालिकेतील तिसरा सामना गुरुवार २९ जुलै रोजी खेळला गेला. हा सामना या मालिकेतील निर्णायक सामना होता. कारण या आधी एक एक सामना जिंकत दोन्ही संघांनी बरोबरी साधली होती. नाणेफेक जिंकत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नाणेफेक हरल्यानंतरही सामन्यावर पूर्णपणे श्रीलंकन संघाचेच वर्चस्व दिसून आले.

हे ही वाचा:

शिवशाहीर बाबासाहेबांचा अद्भूत शिवमय प्रवास आता ऑडिओ स्वरूपात

‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’

‘तुम्ही नुसतेच पर्यावरण मंत्री’…कोकणवासी कडाडले

जी पद्धत स्वीकारायच्ये ती स्वीकारा, पण तातडीने मदत जाहीर करा!

श्रीलंकेकडून वानिंदु हसरंगा याने आपल्या फिरकीने भारतीय फलंदाजांना अक्षरशा: रडवले. भारतीय संघाकडून ऋतुराज गायकवाड, भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव या तीन खेळाडूंनी फक्त दोन आकडी धावा केल्या. तर बाकी सर्वच खेळाडू हे स्वस्तात माघारी गेले. अनेक महत्त्वाचे खेळाडू उपलब्ध नसताना भारतीय संघ हा केवळ ५ फलंदाजांना घेऊन मैदानात उतरला होता. पण त्यातल्या एकालाही भारताचा डाव सावरता आला नाही. भारतीय संघ वीस षटकांमध्ये केवळ ८१ धावा करू शकला. श्रीलंकेकडून हसरंगाने चार षटकांमध्ये केवळ नऊ धावा देत चार महत्त्वपूर्ण बळी टिपले.

८२ धावांचे विजय लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाने अतिशय सहजपणे हे लक्ष्य साध्य केले. भारताकडून फिरकी गोलंदाज राहुल चहर याने प्रभावी गोलंदाजी करत श्रीलंकेचे तीन गडी बाद केले. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. सामन्याच्या पंधराव्या षटकातच हे धावांचे लक्ष्य पूर्ण करत श्रीलंकेने सामन्‍यासह मालिकेवर ही विजयी मोहोर उमटवली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा