मुला-मुलींची राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी पुण्यात

१८ वर्षांखालील मुलांची स्पर्धा

मुला-मुलींची राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी पुण्यात
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली १८ वर्षांखालील मुले आणि मुली यांची राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुण्यात रंगेल. शिवशक्ती महिला मंडळाच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेला आमदार बाबाजी काळे व बापूसाहेब पठारे यांचे सहकार्य लाभले असून दिनांक १४ ते १८ जून २०२५ दरम्यान ही स्पर्धा पार पडेल.
हे ही वाचा:
बिजापूरच्या चकमकीत नक्षलवादी नेता भास्कर राव ठार!
भारतातील कोविड-१९ रुग्णांची संख्या ५,००० च्या वर!
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत!
उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो!
ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे येथे पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांचे एकूण ३१ संघ सहभागी होणार आहेत. या निवड स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ हरिद्वार (उत्तर प्रदेश) येथे २८जून ते ०१ जुलै २०२५ पासून होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना युवा नेते मा. आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेसाठी २५ जिल्ह्यांतील सुमारे १,००० खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक सहभागी होणार असून, ९०० हून अधिक खेळाडूंसाठी निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. बालेवाडी येथील बंदिस्त क्रीडा संकुलातील चार मैदाने आणि इतर क्रीडांगणांवर ही स्पर्धा होणार आहे.
सहभागी जिल्हे: २५
एकूण संघ: ३१
एकूण खेळाडू: सुमारे १०००
स्पर्धेचे ठिकाण: शिवाजी महाराज संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे
स्पर्धेतील सहभागी संघ :
१. मुंबई शहर पूर्व, २. मुंबई शहर पश्चिम, ३. मुंबई उपनगर पूर्व, ४. मुंबई उपनगर पश्चिम, ५. ठाणे शहर, ६. ठाणे ग्रामीण, ७. रायगड, ८. रत्नागिरी, ९. सिंधुदुर्ग, १०. पुणे शहर, ११. पुणे ग्रामीण, १२. पिंपरी-चिंचवड, १३. अहमदनगर, १४. सातारा, १५. सांगली, १६. कोल्हापूर, १७. नाशिक शहर, १८. नाशिक ग्रामीण, १९. जळगाव, २०. धुळे, २१. बीड, २२. उस्मानाबाद, २३. लातूर, २४. जालना, २५. औरंगाबाद, २६. परभणी, २७. नांदेड, २८. सोलापूर, २९. हिंगोली, ३०. नंदुरबार, ३१. पालघर.
Exit mobile version