मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनो मोरीयाच्या घरी छापेमारी होत आहे आणि यानंतर भाजपा मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. दिनो मोरीया प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी शिवसेना-मनसे विलीनीकरण करण्याची चर्चा सुरु आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले. तसेच उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
मंत्री नितेश राणे म्हणाले, दिनो मोरीयावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत, मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात. त्या प्रकरणावरू लक्ष हटवण्यासाठी या दोघांच्या (उद्धव-राज ) येण्याची चर्चा सुरु आहे. कारण या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेंचा मुलगा जेलची वारी करू शकतो, अशा पद्धतीची माहिती त्या केसमध्ये आहे, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणी आता ईडीने अभिनेत्याला समन्स पाठवले आहेत. ईडीने पुढील आठवड्यात चौकशीसाठी दिनो मोरिया, त्याचा भाऊ आणि काही बीएमसी अधिकाऱ्यांसह किमान आठ जणांना समन्स बजावले आहेत. हे लोक वेगवेगळ्या दिवशी त्यांचे जबाब नोंदवतील. मिठी रिव्हर सिल्ट घोटाळ्याप्रकरणी अभिनेत्याची यापूर्वी चौकशी करण्यात आली होती, परंतु आता अभिनेत्याला पुन्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. या प्रकरणात ईडीकडून काल ( ६ जून) अभिनेत्याच्या वांद्रे येथील घरी छापा टाकण्यात आला होता.
हे ही वाचा :
महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये ‘मॅचफिक्सिंग’; राहुल गांधींचा तोच शिळा आरोप
बिजापूरच्या चकमकीत नक्षलवादी नेता भास्कर राव ठार!
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण: विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल!
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत!
दरम्यान, हे प्रकरण मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्याच्या प्रकल्पाशी संबंधित आहे, जे २० वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्पासाठी ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की या काळात एकूण १८ कंत्राटदारांना कंत्राट देण्यात आले होते. यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) उपकरणे भाड्याने घेण्यात आर्थिक अनियमितता केल्याचा आरोप केला. त्यानंतर, ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला.
