विशाळगडावर उरूस, उत्सव, सण व गडावर बकऱ्याच्या कुर्बानीस कोल्हापूर जिल्हा प्रशासन व सरकारकडून बंदी चा निर्णय. हिंदू एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्याकडून साखर पेढे वाटून जल्लोष.
विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याच्या नावाने भरणाऱ्या ऊरुसावर कायमस्वरूपी बंदी घाला त्याच्या नावाच्या उभारलेल्या दर्ग्यावर बुलडोजर फिरवा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ४ जून रोजी संतप्त निदर्शने केली होती. या आंदोलनाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं व कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांनी विशाळगडावर कोणताही उरूस, उत्सव व सण करायला परवानगी देणार नाही असा निर्णय घेतला.
राज्यातल्या महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विशाळगडावर बकऱ्याच्या कुर्बानीस परवानगी देणार नाही, शिवरायांच्या गडाचे पावित्र्यभंग होऊ देणार नाही. असा निर्णय घेतला म्हणून हिंदू एकताने केलेले आंदोलन यशस्वी झालेल्या च्या प्रित्यर्थ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात साखर व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. शिवभक्तांनी संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडला.
हे ही वाचा:
भारतातील कोविड-१९ रुग्णांची संख्या ५,००० च्या वर!
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत!
शर्मिष्ठा पानोली आणि खदिजा शेख प्रकरणात न्यायालयांचा कोणता दृष्टिकोन योग्य?
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन
यावेळी बोलताना हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिकरेहान असो किंवा प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मारलेला अफजलखान असो त्यांच्या थडग्याचे उदात्तीकरण महाराष्ट्र खपवून घेणार नाही. अफजलखानाच्या दर्ग्यावर महायुतीच्या सरकारला जसा बुलडोजर फिरवण्यास भाग पाडले. तशाच पद्धतीने मलिकारेहानचा दर्ग्यासुद्धा बुलडोझर लावून जमीनदोस्त करायला सरकारला भाग पाडू. व कोल्हापूर जिल्हा प्रशासन महाराष्ट्रातला महायुतीचे सरकार हे धाडसी निर्णय घेतल्याबद्दल या दोघांचेही अभिनंदन केले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, प्रकाश चव्हाण, सोमनाथ गोटखिंडे, मनोज साळुंखे, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, केदार खाडिलकर, रवींद्र वाढवणे, राहुल बोळाज,शुभम चव्हाण, प्रदीप कांबळे, विकास आवळे, संजय बापू तांदळे, अनिकेत आंब्रळे, शुभम खोत, प्रकाश निकम, संदेश खोत, अजय काकडे, अरविंद यातनाळे, गजानन माने, इत्यादी शिवभक्त उपस्थित होते.
