26 C
Mumbai
Friday, June 13, 2025
घरविशेषमहाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये 'मॅचफिक्सिंग'; राहुल गांधींचा तोच शिळा आरोप

महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये ‘मॅचफिक्सिंग’; राहुल गांधींचा तोच शिळा आरोप

भाजपाकडून राहुल गांधींवर टीका

Google News Follow

Related

लोकसभेच्या निवडणुकात यश मिळविल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसला तो धक्का अजूनही पचवता आलेला नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ही सगळी निवडणूकच संशयास्पद असल्याचा आरोप केला होता. तोच आरोप त्यांनी आता लेखस्वरूपात केला आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये त्यांनी याबाबत लेख लिहून तेच जुने आरोप केले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका भाजपच्या बाजूने फिक्स करण्यात आल्या होत्या, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी ‘Match-Fixing Maharashtra’ या शीर्षकाखाली Indian Express मध्ये एक op-ed (संपादकीय लेख) लिहून, तो X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केला. या लेखात त्यांनी “निवडणूक कशी चोरावी?” या नावाने भाजपवर निवडणूक प्रक्रियेच्या अपहरणाचा आरोप केला आहे.

हे ही वाचा:

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

“क्रिकेटचा फिरकीपटू थांबला… पियुष चावला निवृत्त!”

राज-उद्धव युतीशी माझा संबंध नाही! तेच प्रतिक्रिया देतील

भारतातील कोविड-१९ रुग्णांची संख्या ५,००० च्या वर!

“२०२४ मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या लोकशाही फसवणुकीसाठीचा ब्लूप्रिंट (नकाशा) होत्या,”
“कारण महाराष्ट्रातील ‘मॅच फिक्सिंग’ बिहारमध्ये येणार आहे आणि नंतर कुठेही भाजप हरत असेल, तिथे ते येणार आहे.

राहुल गांधी यांनी पुढील मुद्यांबाबत आक्षेप घेतले.

१. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केंद्राच्या बाजूने वळवणे:
नवीन कायद्यानुसार पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, आणि विरोधी पक्षनेते यांच्या समितीकडून निवडणूक आयुक्तांची निवड होते. यामध्ये भारताचे सरन्यायाधीश यांना वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी गंभीर आक्षेप घेतला.

२. बोगस मतदारांची भर, मतदार यादीत लाखो बनावट नावे घातल्याचा आरोप.३

३. मतदानानंतर ७.८३ टक्क्यांनी वाढलेला टर्नआउट: हे तब्बल ७६ लाखांचे अतिरिक्त मतदान असून, राहुल गांधींनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

४. फक्त भाजपला विजय हवा तिथेच ‘बोगस मतदान’: भाजपने विशिष्ट मतदारसंघांमध्ये मतदान फसवणूक केल्याचा आरोप.

५. पुरावे लपविणे : या सगळ्या प्रक्रियेचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप.

भाजपचे प्रत्युत्तर

भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींवर गोंधळ घालण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “राहुल गांधी यांचे ध्येय पारदर्शकता नव्हे, तर गोंधळ निर्माण करणे आहे. ते सातत्याने संस्थांवर अविश्वास टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.” ते पुढे म्हणाले, “जेव्हा काँग्रेस जिंकते, तेव्हा व्यवस्था योग्य वाटते. पण हरले की लगेच कारस्थानाच्या कथा सुरू होतात. हे जॉर्ज सोरोसच्या स्टाईलने संस्थांवर हल्ला करून त्यांना आतून उद्ध्वस्त करण्याचे काम आहे.”

या लेखाची पार्श्वभूमी :

  • INDI आघाडीने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा विजय मिळवला होता.

  • पण काही महिन्यांनी विधानसभेत भाजप आणि मित्रपक्षांनी २८८ पैकी २३५ जागा जिंकल्या, हे अनेक विश्लेषक व काँग्रेससाठी धक्का ठरले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा