नक्षलग्रस्त बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी ४५ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी मांडुगुला भास्कर रावला एका चकमकीत ठार मारले आहे. बस्तर आयजींनी याची पुष्टी केली आहे. भास्कर रावच्या डोक्यावर छत्तीसगडमध्ये २५ लाख रुपये आणि तेलंगणामध्ये २० लाख रुपयांचे बक्षीस होते. ही चकमक ६ जून रोजी बिजापूरमधील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात झाली.
चकमकीच्या ठिकाणाहून एके-४७ रायफल आणि इतर स्फोटके, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेला नक्षली भास्कर हा सीपीआय (माओवादी) संघटनेच्या तेलंगणा राज्य समितीच्या मंचेरियल कोमाराम भीमचा (एमकेबी) सचिव होता. यापूर्वी ५ जून रोजीच्या कारवाईत केंद्रीय समिती सदस्य नक्षली गौतम उर्फ सुधाकर याला ठार करण्यात आले. याच्यावर १ कोटींचे बक्षीस होते. त्यानंतर आता नक्षली भास्कर राव याला ठार करण्यात आले आहे. सध्या चकमकीच्या ठिकाणी इतर नक्षलवाद्यांचा शोध सुरू आहे. परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
हे ही वाचा :
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरण: विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल!
भारतातील कोविड-१९ रुग्णांची संख्या ५,००० च्या वर!
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत!
राहुलजी, २००९ मध्ये ५ महिन्यांत ३० लाख मतदार वाढले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का?
दरम्यान, अलिकडच्या काळात तीन मोठे नक्षलवादी मारले गेले आहेत. ज्यामध्ये २१ मे रोजी नक्षलवादी नंबला केशव राव उर्फ बसवराजू याला दलाने ठार मारले. तो नक्षलवाद्यांचा सरचिटणीस होता. त्यानंतर नक्षलवादी सुधाकरला ठार कर करण्यात आले आणि आता नक्षलवादी भास्कर रावला ठार केले. नक्षलवाद्यांच्या प्रमुख नेत्यांना ठार करण्यात आल्याने उर्वरित नक्षली भयभीत झाले आहेत, ज्यामुळे अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, करत आहेत.
