27.6 C
Mumbai
Tuesday, June 24, 2025
घरविशेषराहुलजी, २००९ मध्ये ५ महिन्यांत ३० लाख मतदार वाढले तेव्हा तुम्ही घोटाळा...

राहुलजी, २००९ मध्ये ५ महिन्यांत ३० लाख मतदार वाढले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल 

Google News Follow

Related

निवडणुका कशा चोरायच्या याचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुका हे उदाहरण असल्याचे म्हणत निवडणुकीच्या निकालावर आरोप करणाऱ्या राहुल गांधीना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. बावनकुळे यांनी सोशल मिडीयावर आकडेवारी देत राहुल गांधींचे आरोप खोडून काढले आहेत.

मंत्री बावनकुळे ट्वीटकरत म्हणाले, राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात ५ महिन्यांत ३९ लाख मतदारांची वाढ “संशयास्पद” आहे. पण राहुलजी २००९ ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो. एप्रिल २००९ ला लोकसभा निवडणुकीत ७ कोटी २९ लाख ५४ हजार मतदार होते तर ऑक्टोबर २००९ ला विधानसभा निवडणुकीत ७ कोटी ५९ लाख ६८ हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त ५ महिन्यांत ३० लाख मतदार वाढले होते.

तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? याचं उत्तर द्या. २००४, २००९ ला जिंकलात तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत. आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं.

हे ही वाचा  : 

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

चर्चा अमेरिकेतील मारुती कांबळेची; मस्क यांनी ट्रम्प यांच्या लंगोटीलाच हात घातला…

पंतप्रधान मोदींना कॅनडाच्या पंतप्रधानांचा फोन, G-७ शिखर परिषदेसाठी दिले आमंत्रण!

वडिलांच्या नावावर काहीजण फुशारक्या मारतात!

राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात.

आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमताने निवडून दिले. जनतेने आमच्यावर दाखविलेला हा विश्वास आहे. तो पुढील निवडणुकीतही असाच अभंग राहील. आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनदेशाचा अपमान करीत आहात. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असे मंत्री बावनकुळे म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
253,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा