आज सांस्कृतिक विभागातर्फे राज्याच्या एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर संबंधित तज्ञांबरोबर एक बैठक घेण्याचा उपक्रम आपण केलेला आहे. आपण सगळे जाणताचं राज्यामध्ये प्राथमिक माहिती जी समोर आली आहे त्यामध्ये ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांचं वास्तव्य आहे अशा ३,००० च्या वर बारव या व्यवस्था, जुन्या विहिरींच्या व्यवस्था आहेत.
आणि मग या सगळ्यामध्ये ऐतिहासिक मूल्य सुद्धा आहेत. ज्या पद्धतीचं स्थापत्यशास्त्र वापरलं आहे, त्या स्थापत्यशास्त्राचा नमुना जगामध्ये दुर्मिळ आहे. जलसंवर्धन आणि जलसंधारण याचं कार्यही होतंय. त्या पाण्याची उपयोगिताही झाली पाहिजे. आणि म्हणून राज्यभरातल्या जिल्हाशहा असलेल्या या सगळ्या बारव आणि त्या बारवाच्या नोंदणी याची आवश्यकता लक्षात येते.
म्हणून आम्ही आज निर्णय केला की पहिल्यांदा तर या बारव जतन, संवर्धन आणि उपयोगिता याची स्पष्ट उद्दिष्ट्ये आणि हेतूदर्शित केलेला नव्याने शासन निर्णय आपण त्या ठिकाणी करणार आहोत. या सगळ्यामध्ये शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांबरोबर यावर जलसंधारणात, ऐतिहासिक वारसा विषयामध्ये आणि अन्य असलेल्या तज्ञांना सुद्धा जे पाण्यावर काम करत आहेत, अशा एक तज्ञांची सुद्धा समिती आपण त्यामध्ये करणार आहोत. हा दुसरा निर्णय आपण त्या ठिकाणी केलेला आहे.
आणि पुढची मार्गाक्रमण सुद्धा आपण ठरवली आहे. ज्यामध्ये जिल्हाशहा याचं सर्वेक्षण आपण करणार आहोत पहिल्या टप्प्यात. दुसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचं दस्तावेजीकरण आपण त्या ठिकाणी करणार आहोत. या सगळ्या बारवाच्या शासकीय नोंदी हा सुद्धा भाग आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. या सगळ्यांबद्दल शास्त्रीय व्यवस्थेतील तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाशहा तज्ञांनी काय काम केल्यावर या बारवाचं जतन, संवर्धन आणि उपयोगिता होईल याचं मार्गदर्शन आपण त्यामध्ये घेणार आहोत.
बरोबर, ज्यावेळेला सर्वेक्षणातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यावर यापुढे जिल्हाशहा राज्यभरात यांची उपयोगिता आणि याचं जतन, संवर्धन कसं केलं पाहिजे ते लोकसहभागातून, विद्यार्थी असेल, जिल्हाधिकारी असेल, जिल्ह्यातले तज्ञ असतील त्याचं जनतेमध्ये माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी पथनाट्य किंवा अन्य कुठला प्रकार असेल या पद्धतीने त्याची कार्यपद्धती सुद्धा स्पष्ट करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे.
हे ही वाचा :
डोक्यावर एक कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी सुजाताचे आत्मसमर्पण
जनरल आसिम मुनीर कुटुंबातील महिलांना बनवत आहेत लक्ष्य
मणिपूरमधील सर्व संघटनांनी शांततेच्या मार्गाने स्वप्ने पूर्ण करावीत
मुंबई विमानतळावर नेपाळी, बांगलादेशी नागरिक अटकेत
म्हणून येत्या तीन महिन्यांमध्ये यातला प्राथमिक सर्वेक्षणाचा राज्यातल्या सर्व बारवांच्या नोंदीचा स्पष्ट अहवाल आपला शासन दरबारी आपण त्याची बैठक घेऊन यापुढे राज्यासाठी प्रत्येक पाण्याचा थेंब वाचवावा, प्रत्येक ऐतिहासिक वारसाची मूल्य असलेल्या पाणी संवर्धनाच्या या बारवांची नोंद व्हावी आणि बरोबरीने या बारवांची उपयोगिता जनतेसाठी व्हावी अशा एका महत्त्वाच्या विषयाचा निर्णय आपण त्या घेतला आहे. याबद्दल मला खूप समाधान आहे.







