25 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेष’स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘खालिद का शिवाजी’सह ‘जुनं फर्निचर' चित्रपटाची 'कान आंतरराष्ट्रीय चित्रपट...

’स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘खालिद का शिवाजी’सह ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त निवड!

सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांची घोषणा

Google News Follow

Related

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील ‘कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’साठी (Cannes Film Festival) तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांनी आज (२० एप्रिल) दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ मे २०२५ या कालावधीत ‘कान चित्रपट महोत्सव’ संपन्न होणार आहे. कान या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. महामंडळामार्फत सन २०१६ पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जात आहेत. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि जागतिक सिनेप्रेमींना मराठी चित्रपटाची भूरळ पडावी, हा यामागचा हेतू आहे. या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम यांचा यात समावेश होता.

‘स्थळ’
भारतातील ग्रामीण भागातील पारंपारिक अरेंज मॅरेज व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘स्थळ’ हा चित्रपट आहे. समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धत, रंगभेद आणि सामाजिक दृष्टिकोन अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. सचिन पिळगांवकर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. अभिनेत्री नंदिनी चिकटे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. जयंत सोमलकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

‘स्नो फ्लॉवर’
‘स्नो फ्लॉवर’ या मराठी चित्रपटात मार्मिक, क्रॉसकंट्री कथा सांगणारा आहे. रशिया आणि कोकण या दोन वेगळ्या संस्कृतींना जोडणारा हा चित्रपट आहे. बर्फाळ सायबेरिया आणि हिरवेगार कोकण यांच्या विरोधाभासी पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट आहे. गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विठ्ठल अहिरे, छाया कदम, वैभव मांगले आणि सरफराज आलम सफू हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हे ही वाचा : 

साई किशोरला एक ओव्हरच का?

जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे पूर, तिघांचा मृत्यू!

संग्राम थोपटेंच ठरलं, ‘या’ तारखेला करणार भाजपात प्रवेश!

“IPL च्या रंगमंचावर छोट्या वयातला राजा!”

‘खालिद का शिवाजी’
राज मोरे यांच्या ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात खालिद हा मुलगा मुस्लिम धर्मीय असल्याने त्याला इतर मुलं एकटं पाडतात. त्याचे निरागस डोळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

‘जुनं फर्निचर’
महेश मांजरेकर अभिनीत आणि दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्त्वावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात वृद्धापकाळात पोहोचल्यावर आपलीच मुले आपल्याला कशाप्रकारे नाकारतात आणि त्यामुळे होणारे हाल दाखवण्यात आले आहेत. अभिनेता भूषण प्रधान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा