32 C
Mumbai
Friday, March 6, 2026
घरविशेषरविवारी शेअर बाजाराला सुट्टी नाही, अर्थसंकल्पामुळे बाजार राहणार सुरू

रविवारी शेअर बाजाराला सुट्टी नाही, अर्थसंकल्पामुळे बाजार राहणार सुरू

अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत बजेट मांडणार

Google News Follow

Related

भारतीय शेअर बाजारांच्या इतिहासात एक दुर्मीळ घटना घडणार आहे. रविवार (१ फेब्रुवारी) रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सुरू राहणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६- २७ सादर होत असताना बाजाराशी थेट समन्वय साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन रविवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना धोरणात्मक घोषणांवर तत्काळ प्रतिक्रिया देता येणार आहे.

गेल्या २७ वर्षांतील हा केवळ दुसरा प्रसंग आहे, जेव्हा भारतीय शेअर बाजार रविवारी पूर्ण व्यवहार सत्रासह चालू राहणार आहेत. यापूर्वी २८ फेब्रुवारी १९९९ रोजी रविवारी बाजार खुले होते, तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय बजेट सादर केले होते. त्याच वर्षी बजेट सादर करण्याची पारंपरिक वेळ संध्याकाळी ५ वाजताऐवजी सकाळी ११ वाजता करण्यात आली, जी आजही कायम आहे.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजने जारी केलेल्या परिपत्रकात १ फेब्रुवारी रोजी लाईव्ह ट्रेडिंग सत्र होणार असल्याची पुष्टी केली आहे. प्री- ओपन सत्र सकाळी ९.०० ते ९.०८ या वेळेत होईल, तर नियमित व्यवहार ९.१५ ते ३.३० या वेळेत चालतील. बीएसईही याच वेळापत्रकानुसार पूर्ण सत्रात कार्यरत राहील.

जरी रविवारी बजेट आणि बाजार व्यवहार ही अपवादात्मक बाब असली, तरी शनिवारी बजेट सादर होण्याची उदाहरणे यापूर्वीही आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी २०२५- २६ चा बजेट शनिवारी सादर केला होता. त्याआधी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५ आणि २०१६ मध्ये शनिवारी बजेट मांडले होते. तसेच २००१ आणि २००४ मध्येही संसद कॅलेंडरशी सुसंगत राहण्यासाठी शनिवारी बजेट सत्रे आयोजित करण्यात आली होती. यंदाचा बजेट आणखी महत्त्वाचा मानला जात आहे, कारण निर्मला सीतारामन यांचा हा सलग नववा बजेट असेल.

हे ही वाचा:

आत्मनिर्भरतेकडे भारताचे पाऊल! देशात L410 NG विमानाची निर्मिती होणार?

कोलकात्यामधील उच्चभ्रू रेस्टॉरंटमध्ये हिंदू फूड व्लॉगरला दिले गोमांस

दिल्ली स्फोटप्रकरणातून नवी माहिती, यहुदी कॉफी चेनला करायचे होते लक्ष्य

चांदीच्या किंमती एका दिवसात १ लाखांनी घसरल्या! सोन्याची काय परिस्थिती?

कर धोरण, राजकोषीय तूट, पायाभूत सुविधा खर्च, उत्पादन क्षेत्राला चालना आणि सीमा शुल्क (कस्टम्स ड्युटी) यामधील संभाव्य बदलांकडे बाजारातील सहभागी आणि गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे. विश्लेषकांच्या मते, रविवारी बाजार खुले राहिल्याने बजेट घोषणांचा परिणाम तात्काळ शेअर किमतींमध्ये दिसून येईल, ज्यामुळे अस्थिरताही वाढू शकते. सामान्यतः बजेटच्या दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येतात. अशा परिस्थितीत रविवारी ट्रेडिंगला परवानगी देणे ही सरकार आणि नियामकांची धोरणात्मक पारदर्शकता आणि रिअल-टाइम प्राइस डिस्कव्हरी (किंमत शोध) यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका दर्शवते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा