25 C
Mumbai
Monday, March 2, 2026
घरविशेषमुंबई मराठी ग्रंथालय आवारात फेरीवाल्यांचे 'साहित्य'

मुंबई मराठी ग्रंथालय आवारात फेरीवाल्यांचे ‘साहित्य’

नगरसेविका स्वाती संजय जयस्वाल यांच्याकडून डीप क्लिनिंग मोहिम

Google News Follow

Related

कांदिवली पूर्व, आकुर्ली रोड येथील मुंबई मराठी ग्रंथालय परिसरात फेरीवाल्यांनी बेकायदेशीररित्या कब्जा करून आपले सामान लपवून ठेवल्याचा प्रकार वॉर्ड २४ मध्ये सुरू असलेल्या डीप क्लिनिंग मोहिमेदरम्यान उघडकीस आला.

वॉर्ड २४ च्या नगरसेविका स्वाती संजय जयस्वाल यांनी आकुर्ली रोड परिसरात हाती घेतलेल्या विशेष स्वच्छता आणि अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान ग्रंथालयाच्या गेटला फेरीवाल्यांनी स्वतःचे लॉक लावून आतमध्ये २० हून अधिक फेरीवाल्यांनी आपले साहित्य साठवून ठेवले असल्याचे आढळले. या प्रकारामुळे सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर होत असून सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

नगरसेविका स्वाती जयस्वाल यांच्या निर्देशानुसार संबंधित लॉक तोडून आत ठेवलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या साहित्यामध्ये २ ते ३ गॅस सिलेंडर व स्टोव्हचा समावेश असून, ही बाब अत्यंत धोकादायक स्वरूपाची असल्याचे निदर्शनास आले.

हे ही वाचा:

व्हेनेझुएलाचे कच्चे तेल पुन्हा भारताकडे

अनिल अंबानींचे साडेतीन हजार कोटींचे घर जप्त

एपस्टीन प्रकरणावरून बिल गेट्स यांची जाहीर माफी

खाण विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या घरात सापडली ‘पैशाची खाण’

सार्वजनिक ठिकाणे अतिक्रमणमुक्त ठेवण्याचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा संकल्प कायम ठेवत वॉर्ड २४ मध्ये ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती नगरसेविका स्वाती संजय जयस्वाल यांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा