27.9 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरविशेषकारगिल युद्धातील वीरांच्या यशोगाथेने विद्यार्थी मंत्रमुग्ध

कारगिल युद्धातील वीरांच्या यशोगाथेने विद्यार्थी मंत्रमुग्ध

Google News Follow

Related

कारगिल विजय दिवसाच्या मुहूर्तावर, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबईच्या वतीने मराठी सांस्कृतिक समिती रंगवर्धनतर्फे विद्यार्थ्यांसाठी एका विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वीरमाता अनुराधा गोरे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी त्यांचे सुपुत्र, शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या बलिदानाची कथा सांगून विद्यार्थ्यांना देशसेवेत काही वर्षे सेवा देण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी यावेळी कारगिल युद्धातील अनेक वीरांची यशोगाथा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली.

या युद्धात नौसेना आणि वायुसेना यांनी बजावलेल्या कामगिरीची माहिती दिली. भारतीय सैन्याच्या कामगिरीचे अनेक अपरिचित पैलू त्यांनी प्रकाशात आणून विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी उद्युक्त केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांचे मन जिंकले, व शौर्य आणि देशभक्तीची महती अधोरेखित केली.

हेही वाचा..

जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पोहोचवणारा अटकेत!

आमीर खान २५ आयपीएस अधिकाऱ्यांना का भेटला? कारण आले समोर!

ली जुन-सोक यांच्या घरी विशेष तपास पथकाची छापेमारी

थायलंड आणि कंबोडिया यांच्यात युद्धविराम

या कार्यक्रमात संचालक डॉ. सचिन कोरे तसेच विद्यार्थी क्रियाकलाप प्रमुख डॉ. सुरंजना गंगोपाध्याय यांनीही सहभाग घेत, विद्यार्थ्यांना देशसेवेमधील अभियंत्यांचे योगदान वाढविण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. अशा प्रेरणादायी प्रसंगामुळे युवकांमध्ये सैन्यदलातील विविध संधी आणि त्याद्वारे देशसेवेचे सर्वोच्च कर्तव्य यांची आवड वाढवण्याचा उद्देश साध्य झाला. याप्रसंगी श्रीमती अनुराधा गोरे यांनी त्यांचे या विषयावरील पुस्तक संस्थेला ग्रंथालयास भेट दिले. संचालक डॉ सचिन कोरे यांनी अशी पुस्तके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावीत अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा