धर्मनिरपेक्ष पक्ष ‘पागल ए आझम’ बनण्याच्या दिशेने!

औरंगजेबाच्या मुद्द्यावरून सुधांशू त्रिवेदी यांची घणाघाती टीका

धर्मनिरपेक्ष पक्ष ‘पागल ए आझम’ बनण्याच्या दिशेने!

समाजवादी पक्ष (सपा) चे आमदार अबू आजमी यांच्या औरंगजेब संदर्भातील विधानावर भारतीय जनता पक्ष (भाजप) चे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष मुघलांचं कौतुक करण्याच्या स्पर्धेत लागले आहेत आणि स्वतःला सर्वात मोठा ‘मुगल-ए-आझम’ सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर, हे पक्ष ‘पागल-ए-आझम’ बनण्याच्या दिशेने पुढे जात आहेत.”

त्रिवेदी यांनी सपा आणि काँग्रेसवर निशाणा साधत विचारलं की, औरंगजेब बाबरच्या वंशाचा होता, ज्याची आई मंगोल आणि वडील उझबेक होते. अशा परिस्थितीत त्याचं भारताशी काय नातं आहे? त्यांनी विपक्षी पक्षांवर औरंगजेबचं महिमामंडन करून समाजात द्वेष पसरवण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, औरंगजेबनं आपल्या वडिलांना मृत्युशय्येवर पाणी देखील नीट दिलं नाही, तरीही इंडी अलायन्सचे नेते त्याचं कौतुक करत आहेत, जे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आणि लज्जास्पद आहे.

हे ही वाचा:

बंदुका निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड

गोरेगाव येथे पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

इस्त्रायलकडून सीरियन बटालियनवर हवाई हल्ले

रोहित पवारांपेक्षा अंकुश चौधरी बरा!

त्यांनी पुढे सांगितलं की, औरंगजेबची क्रूरता इतिहासात नोंदवली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेले षड्यंत्र, संभाजी महाराजांची हत्या आणि शीख गुरूंचं बलिदान हे संपूर्ण देशाला माहिती आहे. तरीही विपक्षी पक्ष त्याचं महिमामंडन करत आहेत, हे निंदनीय आहे.

Exit mobile version