कुरार पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पोलीस शिपायाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी समोर आली आहे.पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी मिळाली असून त्यावरून पोलीस शिपाई सुभाष कांगणे तणावात होते असे आढळून आले आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
सुभाष कांगणे (३७) हे गोरेगाव येथील नागरि निवारा संकुल येथे पत्नी आणि दोन मुलांसह राहण्यास होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी आणि मुले गावी गेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुभाष कांगणे हे कुरार पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते.सोमवारी सांयकाळी कांगणे यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला.
हे ही वाचा:
बंदुका निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड
इस्त्रायलकडून सीरियन बटालियनवर हवाई हल्ले
बैठकीत झालेल्या बाचाबाचीनंतर ट्रम्प यांनी युक्रेनची लष्करी मदत थांबवली
रोहित पवारांपेक्षा अंकुश चौधरी बरा!
पोलिस सूत्रांनी सांगितले की, सुभाष कांगणे यांच्या मृतदेहजवळ मिळून आलेल्या चिठ्ठीवरून असे आढळून आले की, सुभाष कांगणे यांच्या नावाने कोणीतरी वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पोलीस उपायुक्त यांच्याकडे बोगस लेखी तक्रार केली होती, त्यामुळे ते तणावात होते, असे पोलिसांनी सांगितले. चिठ्ठीत केलेल्या आरोपांची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, कंगणे यांच्या कथित आत्महत्येमागील कारणे शोधण्यासाठी ते त्यांच्या पत्नीचे तसेच त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचे जबाब नोंदवतील, असे अधिकाऱ्याने सांगितले.