उत्तर प्रदेशच्या मथुरा पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई करत अवैध गन फॅक्टरीचा भांडाफोड केला. या प्रकरणात दोघा सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान पोलिसांना ३२ बोअरची रिव्हॉल्वर, ३१५ बोअरची रायफल, चार कट्टे, मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि शस्त्रनिर्मितीसाठी लागणारी साधने मिळून आली आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रोहित आणि हेमंत अशी आहेत. चकमकीदरम्यान त्यांच्या पायाला गोळी लागली असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांचा एक साथीदार हाकिम सिंग फरार झाला आहे.
हेही वाचा..
अबू आझमींवर देशद्रोहाचा खटला चालवा, अधिवेशनातून निलंबित करा
दिलीप जायस्वाल यांच्या निवडीची औपचारिकता शिल्लक
सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृती ठीक नसल्याचे धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचे दिले कारण
इस्त्रायलकडून सीरियन बटालियनवर हवाई हल्ले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सराईत गुन्हेगार बराच काळ वेगवेगळ्या ठिकाणी अवैध शस्त्रनिर्मिती कारखाने चालवत होते. सध्या पोलिस फरार आरोपी हाकिम सिंगचा शोध घेत आहेत. अवैध शस्त्र जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक त्रिगुणे विसेन यांनी माहिती दिली की, गेल्या काही दिवसांपासून आम्हाला अवैध शस्त्रनिर्मितीबाबत माहिती मिळत होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती अशी निर्माण झाली की पोलिसांना आत्मरक्षेसाठी गोळीबार करावा लागला.
पोलिसांच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत दोघांच्या पायाला गोळी लागली, त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या साथीदार हाकिम सिंगबाबत माहिती दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सात पूर्णपणे तयार असलेली शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे आहेत. यांचा गुन्हेगारी इतिहास तपासला जात आहे. जखमी आरोपींवर उपचार सुरू असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.