नाशिक धर्मांतर प्रकरणात मार्च महिन्यापासून फरार असलेली आरोपी निदा खानला पकडण्यात आल्यानंतर तिला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेल याच्या मोबाईलमध्ये आता अनेक अश्लिल व्हीडिओ सापडल्याचे आरोप केले जात आहेत. निदा खानला छत्रपती संभाजीनगरातील ज्या घरातून अटक करण्यात आली, ते घर एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याचा फोन ताब्यात घेण्यात आला होता.
महानगरपालिकेने मतीन पटेलचे ते घर आणि कार्यालयावर अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावत बुलडोझर चालविण्याचा इशारादेखील दिला आहे. यासंदर्भात उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी मतीन पटेल याच्या मोबाईलमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ असल्याचा आणि ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप केला आहे. त्याचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणीही जंजाळ करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण हे सांगताना मतीन पटेल हा निव्वळ एक मोहरा आहे, त्यामागे मोठे रॅकेट असल्याचा आरोपही जंजाळ यांनी केला आहे.
मतीन पटेलच्या ज्या घरात निदा लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधलं असल्याची नोटीस माहापालिकेकडून देण्यात आलीय. तीन दिवसात खुलासा न केल्यास घर पाडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. त्यांचं नारेगाव परिसरातील दुसरं राहते घर आणि नारेगाव परिसरातील त्याच्या ऑफिसला ही अतिक्रमण केल्यासंदर्भातली नोटीस बजावण्यात आली आहे.
हे ही वाचा:
१३ वर्षांत भाजपाचे ७७३ वरून १८०५ आमदार
‘ऐसा कोई सगा नहीं, जिसे काँग्रेसने ठगा नहीं’
अशी गाठली चांदीने ऐतिहासिक उंची
देशातील सर्वात मोठ्या IPO ची तयारी
निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरातील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला पोलिसांनी सहआरोपी केलं आहे. त्याच्यावर त्याआधी गुन्हा दाखल झाला. जवळपास ४२ दिवसांनंतर निदा खानला पोलिसांनी अटक केली. नाशिकमधील टीसीएस प्रकरणातील धर्मांतरण प्रकरणी निदा खानच्या चौकशीत अनेक बाबी समोर येणार आहेत. त्याचसोबत महिन्याभराच्या काळात तिला कुणी आश्रय दिला याचाही उलगडा होण्याची शक्यता आहे.







