28.7 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरबिजनेसदेशातील सर्वात मोठ्या IPO ची तयारी

देशातील सर्वात मोठ्या IPO ची तयारी

एनएसईचा २३ हजार कोटींचा मेगा इश्यू लवकरच

Google News Follow

भारतातील सर्वात मोठी शेअर बाजार संस्था नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात एनएसई आता स्वतःच शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला एनएसईचा आयपीओ अखेर अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत असून जून २०२६ अखेरपर्यंत कंपनी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस अर्थात डीआरएचपी दाखल करू शकते. नियामक मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर २०२६ पर्यंत एनएसईचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आयपीओद्वारे सुमारे २३ हजार कोटी रुपये उभारण्याची तयारी सुरू असून हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो.
हे ही वाचा:
प्रोजेक्ट कुडनकुलम: आत्मनिर्भर अणुक्रांती

पश्चिम बंगालमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

शतायुषी निसर्गप्रेमी डेव्हिड ऍटनबरोंना एका निसर्गप्रेमीच्या अशाही शुभेच्छा!

हार्दिक, अक्षर आणि शिवम दुबेवर भारी पडतोय हा युवा ऑलराउंडर

सध्या देशातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि हुंडई मोटर इंडिया यांच्या नावावर आहे. मात्र एनएसईचा प्रस्तावित इश्यू हा त्या विक्रमालाही मागे टाकू शकतो. या इश्यूमध्ये कंपनी नवीन शेअर्स जारी करणार नसून ऑफर फॉर सेल अर्थात ओएफएस पद्धतीने विद्यमान गुंतवणूकदार आपली हिस्सेदारी विकणार आहेत. अंदाजे ४ ते ५ टक्के हिस्सेदारी विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते.

एनएसईने पहिल्यांदा २०१६ मध्ये आयपीओसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र को-लोकेशन प्रकरण, नियामक चौकशी आणि काही कायदेशीर अडचणींमुळे संपूर्ण प्रक्रिया रखडली होती. गेल्या काही महिन्यांत प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा निघण्यास सुरुवात झाल्यानंतर आयपीओचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. बाजार नियामक सेबीकडून आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी एनएसईने मोठ्या प्रमाणात तयारी सुरू केली आहे.

या प्रक्रियेसाठी जवळपास २० मर्चंट बँकर्स आणि अनेक कायदेशीर सल्लागार संस्थांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस कंपनीचे अंतिम मूल्यांकन आणि विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या हिस्सेदारीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, भारतीय स्टेट बँक आणि तिची उपकंपनी एसबीआय कॅप्स देखील एनएसईमधील काही हिस्सा विकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही संस्थांच्या हिस्सेदारीचे एकत्रित मूल्य सुमारे ४३ हजार ५०० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे.

एनएसईने नुकतेच मार्च २०२६ तिमाहीचे दमदार आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा तब्बल २ हजार ८७१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इक्विटी आणि ऑप्शन्स ट्रेडिंगमधील वाढत्या व्यवहारामुळे महसूल आणि नफ्यात मोठी वाढ झाली आहे. मजबूत आर्थिक कामगिरी आणि गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास यामुळे एनएसईचा आयपीओ भारतीय शेअर बाजारातील ऐतिहासिक घडामोड ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा