27 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरविशेषकर्णधार सूर्यकुमारने पाकिस्तानवरील विजय केला भारतीय जवानांना समर्पित

कर्णधार सूर्यकुमारने पाकिस्तानवरील विजय केला भारतीय जवानांना समर्पित

भारतीय कर्णधार झाला भावुक

Google News Follow

Related

आशिया कपमधील गट-अ टप्प्यातील भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने कृतीतून आणि शब्दांतून ठसा उमटवला. त्याने पाकिस्तानवर मिळवलेला हा विजय भारतीय जवानांना समर्पित केला.

एप्रिल महिन्यात झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या प्रतिहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा सामना होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होते. बहिष्काराची मागणीही झाली होती. मात्र सामना ठरल्याप्रमाणे दुबईत खेळवला गेला.

टॉसवेळी सूर्यकुमारने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याच्याशी हस्तांदोलन टाळत आपला स्पष्ट संदेश दिला.

विजय सैनिकांना अर्पण

सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमारने भावनिक भाषण करत विजय भारतीय जवानांना आणि पहलगाम हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना समर्पित केला.

तो म्हणाला, मी फक्त काही शब्द बोलू इच्छितो. हा योग्य प्रसंग आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांसोबत आम्ही उभे आहोत.

हे ही वाचा:

लहान-सहान गोष्टी विसरायला लागला आहात?

आता देशात एक डेमोग्राफी मिशन

राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारणार

काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या, दहशतवाद्यांच्या बाजूने उभा राहिला

पुढे तो म्हणाला,  “हा विजय आम्ही आपल्या शूर भारतीय जवानांना समर्पित करतो. त्यांनी दाखवलेले धैर्य आम्हाला सतत प्रेरणा देत राहो. मैदानात आम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू.”

सामना एकतर्फी

भारताने हा सामना एकतर्फी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने केवळ १२७ धावा केल्या. त्यानंतर भारताने हे लक्ष्य फक्त २५ चेंडू राखून गाठले आणि ७ गडी राखून विजय मिळवला. हा भारताचा टी-२०आय क्रिकेटमधील पाकिस्तानविरुद्धचा सर्वात मोठ्या विजयांपैकी एक ठरला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा