23 C
Mumbai
Monday, December 22, 2025
घरविशेषस्वामीराज प्रकाशनतर्फे पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन

स्वामीराज प्रकाशनतर्फे पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन

वाचन चळवळ वृध्दींगत व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने यावेळी यलो गेट आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन भेट

Google News Follow

Related

स्वामीराज प्रकाशन या संस्थेच्या वतीने शनिवारी मराठी आठव दिवस साजरा करण्यात आला. वाचन चळवळ वृध्दींगत व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने यावेळी यलो गेट आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन भेट देण्यात आले. स्वामीराज प्रकाशन संस्थेच्या वतीने दर महिन्याच्या २७ तारखेला मराठी आठव दिवस हा अभिनव उपक्रम राबविण्यात येतो. मराठी भाषा प्रचार, प्रसार आणि संवर्धन हा या उपक्रमाचा हेतू आहे. मे महिन्यातील हा दिवस ” ती ” ला समर्पित होता.भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात हा कार्यक्रम साजरा झाला.

हेही वाचा :

आता ओटीटीवर तंबाखूविरोधी सूचना सक्तीची !

आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार…शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

राज्यशास्त्राच्या विषयातून ‘खलिस्तान’ला हटवले

 २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्युमुखी

यावेळी प्रमुख पाहुण्या सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांचा खास सत्कार करण्यात आला. यलो गेट पोलीस ठाण्याच्या प्रमुख सरला वसावे, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या प्रमुख ज्योती देसाई यांच्यासह मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी नगरसेविका सोनम जामसुतकर, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या उपाध्यक्षा रंजना नेवाळकर, स्वामीराज प्रकाशनच्या संचालिका रजनी राणे, पूजा राणे आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर शब्दाक्षर निर्मित कवी किरण येलें यांच्या ‘ बाईच्या कविता ‘ वर आधारित ‘ स्त्री, जातं, ओवी आणि कविता ‘ हा दीर्घांक सादर झाला. या कार्यक्रमाला महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता .

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा