32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारण २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्युमुखी

 २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्युमुखी

भुट्टावी याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा तुरुंगातील कोठडीत जागीच मृत्यू

Google News Follow

Related

जमात-उद-दावाचा नेता आणि बंदी असलेल्या लष्कर-ए-तैयबाचा (LeT) संस्थापक सदस्य, २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल सलाम भुट्टावी हा शेखूपुरा शहरातील त्याच्या तुरुंगातील कोठडीमध्ये मृतावस्थेत आढळून आला. पंजाब प्रांतातील, अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

‘भुट्टावी याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा तुरुंगातील कोठडीत जागीच मृत्यू झाला,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्थानिक वेळेनुसार, मंगळवारी सकाळी नऊ वाजता लाहोरजवळील मुरीदके येथील एलईटीच्या मुख्यालयात त्याचा दफनविधी करण्यात आला. भुट्टावी (७८) हा एलईटीच्या दहशतवादी आणि त्याच्याशी संबंधित संघटनांना दहशतवादासाठी प्रवृत्त करत असे. तथापि, २००८च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार म्हणून त्याला शिक्षा ठोठावण्यात आली नव्हती. 

पाकिस्तानमधील एका न्यायालयाने भुट्टावी याला जेयूडीचे दोन नेते, मलिक जफर इक्बाल आणि हाफिज अब्दुल रहमान मक्की यांच्यासह ऑगस्ट २०२०मध्ये दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यात अयशस्वी झाल्याबद्दल, जागतिक आर्थिक कृती दलाने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानला सप्टेंबर २०२०ची मुदत दिली होती. त्यामुळे पाकिस्तानला ही कारवाई करावी लागली.  

न्यायालयाने प्रत्येकाला १६ वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा सुनावली होती. हे तिघे एलईटीचे संस्थापक हाफिज सईदचे जवळचे सहकारी मानले जात होते. मुंबई हल्ल्यानंतर जेव्हा सईदला अटक करण्यात आल्यानंतर संघटनेच्या विविध दहशतवादी कारवायांसाठी भुट्टावी यालाच संघटनेचा नेता म्हणून स्थान दिले गेले होते. सन २००२मध्ये भुट्टावी याच्यावर लाहोरमध्ये एलईटीचा संघटनात्मक तळ स्थापन करण्याची जबाबदार होती.

हे ही वाचा:

पीएफआय प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे देशभरात धाडसत्र

मुस्लिमांच्या बाबतीत आज जे होत आहे तेच १९८०मध्ये दलितांबाबत होत होते!

राहुल गांधींनी नरेंद्र मोदी, भाजपाबद्दलचे दुखणे अमेरिकेत सांगितले

कांदिवलीतील प्रेमप्रकरणातून हत्या करणाऱ्या प्रयागराज येथून अटक 

तब्बल २० वर्षे एलईटी दहशतवाद्यांसाठी निधी उभारणी, नव्या दहशतवाद्यांची भरती करणे तसेच, त्यांना दहशतवादी हल्ल्यांसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अमेरिकेने २०११मध्ये भुट्टावी याच्यावर आर्थिक निर्बंध लादले होते. सन २००८मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना उत्तेजन देण्यातही त्याचा सहभाग होता. तसेच, भुट्टावीने एलईडी आणि जमात उद दावाच्या दहशतवादी कारवायांना अधिकृत करणारे फतवेही जाहीर केले होते, असे भुट्टावी याच्यावर निर्बंध लादताना अमिरेकेच्या वित्त विभागाने म्हटले होते.  

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीनेही भुट्टावीला २०१२मध्ये अलकायदाशी संबंधित असल्याबद्दल दहशतवादी म्हणून घोषित केले होते. एलईटीला आर्थिक पुरवठा करणे, संघटनेचे नियोजन करणे, त्यांच्या दहशतवादी कारवायांचा कट रचून तो तडीस नेण्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावेळी सुरक्षा समितीने भुट्टावी याचा उल्लेख एलईटीचा संस्थापक सदस्य आणि सईदचा सहायक म्हणून केला होता. भुट्टावीने २००८च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रेरित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे सुरक्षा समितीने त्यांच्या अधिसूचनेत नमूद केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा