भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये सेमीफायनल सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळले जाण्याची शक्यता आहे.
एका अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ने या मोठ्या स्पर्धेसाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांतील एकूण आठ ठिकाणांची निवड केली आहे.
फायनल सामना कुठे होणार याबाबत मात्र अद्याप निश्चितता नाही. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये या टी-२० विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, सेमीफायनलसाठी कोलकाता आणि अहमदाबाद हे दोन शहरं सध्या सर्वात आघाडीवर आहेत.
भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतातील मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद आणि कोलकाता या पाच शहरांची निवड करण्यात आली आहे.
तर श्रीलंकेत कोलंबोतील दोन स्टेडियम आणि कॅंडीतील एक स्टेडियम निवडण्यात आले आहे.
मात्र, कोणत्या देशात कोणता सामना खेळला जाईल हे त्या वेळी कोणत्या संघांनी पात्रता मिळवली आहे यावर अवलंबून असेल.
जर पाकिस्तान आणि श्रीलंका सेमीफायनलसाठी पात्र ठरले नाहीत, तर दोन्ही सेमीफायनल सामने भारतातच खेळले जाण्याची शक्यता आहे.
तर अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे.
हेही वाचा :
कर्नाटकातील तुरुंगात कैद्यांचे नाचगाणे; तुरुंग अधिकाऱ्याची बदली
गोहत्येत सहभागी असलेल्या आरोपीचे उत्तर प्रदेशात एन्काऊंटर
लालू परिवाराविरुद्धच्या ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणाची सुनावणी ४ डिसेंबरला
केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर नमाज पठण; भाजपाची सिद्धरामय्या सरकारवर टीका
पाकिस्तान जर सेमीफायनलमध्ये पोहोचला, तर त्याचा सामना श्रीलंकेत खेळवला जाईल.
तसेच श्रीलंका अंतिम चारमध्ये पोहोचल्यास, त्यांचा सामना कोलंबोमध्ये खेळला जाईल.
परंतु जर श्रीलंका पात्र ठरली नाही, तर दोन्ही सेमीफायनल सामने भारतातच होणार आहेत.
१७ ऑक्टोबर रोजी आयसीसीच्या निवेदनानुसार, या स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत.
प्रत्येक गटात ५ संघांसह ४ गट असतील.
युरोपियन संघ इटली पहिल्यांदाच या जागतिक टी-२० स्पर्धेत सहभागी होणार आहे.
विश्वचषकाची सुरुवात गट टप्प्यातून होईल, त्यानंतर सुपर-८, आणि मग सेमीफायनल व फायनल सामने खेळले जातील.
भारताने २०२४ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विजेतेपद पटकावले होते.
लवकरच आयसीसी या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करणार आहे.







