27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरविशेषपाचव्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत

पाचव्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत

दुसऱ्या दिवस अखेर टीम इंडिया २५५ धावांनी आघाडीवर

Google News Follow

Related

धरमशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या २१८ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८ गडी गमावून ४७३ धावा केल्या. टीम इंडियाकडे २५५ धावांची आघाडी आहे. जसप्रीत बुमराह ५५ चेंडूत दोन चौकारांसह १९ धावांवर नाबाद परतला, तर कुलदीप यादव ५५ चेंडूत दोन चौकारांसह २७ धावांवर नाबाद परतला आहे. भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी शतके झळकावली. इंग्लंडकडून ऑफ स्पिनर शोएब बशीरने सर्वाधिक चार बळी घेतले.

भारताच्या अव्वल पाच फलंदाजांनी ठोकल्या ५० हून अधिक धावा 
पाचव्या कसोटीत भारताच्या अव्वल पाच फलंदाजांनी ५० हून अधिक धावा केल्या. यात रोहित शर्माने १०३ तर शुभमन गिलने ११० धावांची खेळी केली. तर यशस्वी जयस्वालने ५७, पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडिक्कलने ६५ आणि सर्फराज खानने ५६ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या १५ वर्षांत प्रथमच भारताच्या अव्वल पाच फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

सरफराज आणि पडिक्कल यांच्यात ९७ धावांची भागीदारी
रोहितने १६२ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह १०३ धावा केल्या. तर शुभमन गिल १५० चेंडूत ११० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलने १२ चौकार आणि ५ षटकार ठोकले. हे दोघे बाद झाल्यानंतर सरफराज खान आणि देवदत्त पडिक्कलने भारताची सामन्यावरची पक्कड ढिल्ली पडू दिली नाही. सरफराजने ६० चेंडूत ८ चौकार आणि १ षटकार ठोकला. पडिक्कलने १०३ चेंडूत ६५ धावा केल्या. त्याने १० चौकार आणि एक षटकार ठोकला. तर रविचंद्रन अश्विन आपल्या १०० व्या कसोटीत शून्य धावांवर बाद झाला.

हेही वाचा :

१० बस बदलल्या, वेगवेगळे कपडे घातले.. बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट संशयितांची माहिती समोर!

“ठाकरेंनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने अमेरिकेचा राष्ट्रपती करतो हे सांगण्यासारखं”

महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून १४ मुले जखमी!

रोहित पवारांना ईडीचा झटका, बारामती अ‍ॅग्रो संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त!

बुमराह आणि कुलदीपनेपुढे इंग्रजांन गुडघे टेकले
४२८ धावांत ८ गडी बाद केल्यानंतर कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनीही ब्रिटीशांना धक्का दिला. दोघांनी नवव्या विकेटसाठी १०८ चेंडूत ४५ धावांची भागीदारी केली आहे. टीम इंडिया आज ऑल आऊट होईल असं वाटत होतं, पण बुमराह आणि कुलदीपने तसं होऊ दिलं नाही. या दोघांनी इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांबरोबरच वेगवान गोलंदाजांनाही दाद दिली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा