25 C
Mumbai
Tuesday, February 10, 2026
घरविशेषपायलटच्या गणवेशात कंगना, नवा चित्रपट 'तेजस' येतोय

पायलटच्या गणवेशात कंगना, नवा चित्रपट ‘तेजस’ येतोय

'भारत को छेडोंगे तो छोडेंगे नही'...

Google News Follow

Related

तेजस चित्रपटाचा टिझर अखेर प्रदर्शित झाला आहे.गांधी जयंतीच्या मुहूर्तावर तेजस चित्रपटाच्या निर्मात्याने टिझर प्रदर्शित करत चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.कंगना रणौत ही बॉलिवूडमधील एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे जी सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. चित्रपट असो किंवा राजकीय मत कंगना अगदी स्पष्टपणे सगळीकडे व्यक्त होते. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते. नुकताच कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून तिचा आगामी चित्रपट ‘तेजस’चा टीझर शेयर केला आहे.

 

कंगना रणौत भारतीय हवाई दलाची पायलट तेजस गिलच्या भूमिकेत दिसणार आहे.टीझरच्या सुरुवातीलाच कंगना वैमानिकेच्या भूमिकेत दिसत आहे. त्यावेळी बॅकग्राउंडला आवाज येत आहे,”प्रत्येक गोष्ट बोलण्याची गरज नाही. आता आमने-सामने येण्याची वेळ आली आहे. आता आभाळातून पाऊस नव्हे तर आग येण्याची गरज आहे. भारत को छेडोंगे तो छोडेंगे नही”.

हे ही वाचा:

जीएसटी संकलनात १०.२ टक्के वाढ!

एर्नाकुलममध्ये कार नदीत कोसळून दोन डॉक्टरांचा मृत्यू!

दादरला एका दिवसात १६००हून अधिक फुकटे प्रवासी पकडले!

एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्याविरोधात थोपटले दंड!

या टीझरसह कंगनाने याचं नवीन पोस्टर आणि ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे. ‘एयर फोर्स डे’च्या मुहूर्तावर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. तर ‘तेजस’ २७ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.आरएसवीपीच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सर्वेश मेवारा आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित करण्यात आला आहे.हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा