29.4 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरविशेषतेजस्वी यादव यांनी आधी आपल्या पक्षाचा आणि कुटुंबाचा विचार करावा!

तेजस्वी यादव यांनी आधी आपल्या पक्षाचा आणि कुटुंबाचा विचार करावा!

मोदींच्या बिहार दौऱ्यावर तेजस्वी यादव यांच्या टीकेवर दिलीप घोषांचे जोरदार प्रत्युत्तर

Google News Follow

Related

बिहार दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या टीकेवर भाजप नेते दिलीप घोष यांची प्रतिक्रिया दिली आहे.  तेजस्वी यादव यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते दिलीप घोष म्हणाले, “त्यांनी आधी आपल्या पक्षाचा आणि कुटुंबाचा विचार करावा. ओडिशा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री कुठे गेले, हे बघा. बिहारच्या जनतेने त्यांच्या (तेजस्वी यादव यांच्या) कुटुंबाने राज्यासाठी काय केलं आहे, हे अजून विसरलेले नाहीत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर RJD नेते तेजस्वी यादव यांनी टीका केली होती. त्यांनी म्हटलं, “पंतप्रधान ‘जुमले कि बारीश'(आश्वासनांचा पाउस) करायला येत आहेत. राज्यात कोणताही विकास होत नाहीये. पंतप्रधान कधीही खऱ्या मुद्द्यांवर बोलत नाहीत. ते फक्त घुसखोरांविषयी बोलतील, पण बिहारच्या विकासावर किंवा गरिबांच्या जीवनात सुधारणा कशी करायची यावर काहीही बोलणार नाहीत.”

ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान पूर्णियामध्ये येणार आहेत, तर तिथल्या वैद्यकीय महाविद्यालयालाही भेट द्यावी. आणि ‘साथ में मेरे चाचा को भी ले जाएं’ (माझ्या काकाला घेवून जा) म्हणजे त्यांना खरी परिस्थिती काय आहे, तेही दिसेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा