28 C
Mumbai
Friday, April 17, 2026
घरविशेषमोकळ्या जागांबाबतच्या तात्पुरत्या धोरणाला स्थगिती द्या!

मोकळ्या जागांबाबतच्या तात्पुरत्या धोरणाला स्थगिती द्या!

भाजप आमदार व मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांचे मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र

Google News Follow

Related

शहरातील झपाट्याने कमी होत असलेल्या मोकळ्या जागांचे रक्षण करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने आणलेले तात्पुरते धोरण स्थगित करावे. तसेच शहरातील एकही मोकळी जागा खाजगी संस्थांना देवू नये अशी, मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे. मोकळ्या जागांच्या देखभालीसाठी जाहिरातींच्या द्वारे महसूल उभारावा, असे आवाहनही आमदार साटम यांनी महापालिकेला केले आहे.

मोकळ्या जागांसाठी पालिकेकडे व्यापक धोरण नसल्याची बाब अधोरेखीत करत आमदार अमीत साटम म्हणाले की, पालिकेचे धोरण तातुरते असून ते ११ महिन्यांच्या करारांवर खाजगी पक्ष, न्यास किंवा संस्थांना खुल्या जागा देखभालीसाठी देण्यास परवानगी देते. मोकळ्या जागांबद्दल नागरिकांमध्ये चिंता आहेत, या जागा हडपल्या जाण्याची भीती आहे. काही मोकळ्या जागांचे नफा कमावण्यासाठी क्लब किंवा जिमखान्यात कायमचे रूपांतर केले जाऊ शकते.

हे लक्षात घेतले पाहिजे की आमदार अमीत साटम यांनी त्यांच्या अंधेरी (पश्चिम) विधानसभा मतदारसंघात ६० हून अधिक मोकळ्या जागांचा विकास करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे आणि त्या सर्व जागा महापालिकेद्वारे देखभाल केल्या जात आहेत.

आमदार अमीत साटम पुढे म्हणाले की, मोकळ्या जागा देखभालीचे धोरण बनवताना प्रशासनाने सार्वजनिक भावना लक्षात घेतल्या नाहीत, परिणामी धोरणाला तीव्र विरोध झाला. सर्व मोकळ्या जागांची देखभाल पालिकेनेच करावी. त्या खाजगी पक्ष, ट्रस्ट, संघटना किंवा संस्थेला देऊ नयेत. या मोकळ्या जागांमध्ये जाहिराती नियंत्रित करून देखभालीसाठी पालिका महसूल निर्माण करु शकते.

हे ही वाचा : 

“देवरियामध्ये धर्मांतर सिंडिकेटचा पर्दाफाश: त्रयनाथ बनला अब्दुल रहमान, लक्ष्मी झाली सलमा”

तेजस्वी यादव यांनी आधी आपल्या पक्षाचा आणि कुटुंबाचा विचार करावा!

भारत- रशिया संबंध बिघडवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील!

पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी डीजेने वाजवला ‘जलेबी बेबी’

नवीन नागरिक-अनुकूल धोरण तयार होईपर्यंत सध्याच्या ११ महिन्यांच्या तात्पुरत्या धोरणांतर्गत कोणत्याही नवीन मोकळ्या जागांचे वाटप करु नये, असे आवाहन आमदार अमीत साटम यांनी पालिका प्रशासनाला केले आहे.

एखाद्या ट्रस्टने किंवा खाजगी पक्षाने जागा ताब्यात घेतली की, त्यांना बाहेर काढणे कठीण होते. काही ट्रस्ट धोरण अंतिम होण्यापूर्वी ११ महिन्यांच्या धोरणाअंतर्गत हितसंबंधांसह अर्ज करत आहेत. या संस्थाना शहरातील एकही मोकळी जागा दिली जाणार नाही, याची खात्री पालिका प्रशासनाने करावी. सर्व मोकळ्या जागा पालिकेने स्वत:कडे राखल्या पाहिजेत, अशी मागणी आमदार अमीत साटम यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा