28 C
Mumbai
Wednesday, March 4, 2026
घरविशेषअहिल्यानगरात 'आय लव्ह मोहम्मद'च्या रांगोळीवरून तणाव; मुस्लिमांचा रास्तारोको, दगडफेक!

अहिल्यानगरात ‘आय लव्ह मोहम्मद’च्या रांगोळीवरून तणाव; मुस्लिमांचा रास्तारोको, दगडफेक!

पोलिसांकडून लाठीचार्ज, ३० जण ताब्यात

Google News Follow

Related

अहिल्यानगरच्या कोटला गावातील मुल्सिम समाज रस्त्यावर उतरला आहे. धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप करत अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर इथल्या मार्गावरती मुस्लीम समाजाने रास्तारोको आंदोलन केलं. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी ३० संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडच्या काळामध्ये असा काहीतरी प्रयत्न केला जातोय, राज्यामध्ये अशा प्रकारची वेगवेगळी बोर्ड लावायची. आणि इथलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करायचं. याच्या पाठीमागे कोण आहे? हे शोधू आणि त्याच्यावर कारवाई करू, असे  मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या प्रकरणावर माहिती देताना पोलीस म्हणाले, आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीवर मुस्लीम समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि ज्याने रांगोळी काढली होती त्याला अटकही केली होती. मात्र, काही मुस्लीम लोक एकत्रित जमले आणि त्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. यानंतर पोलिसांनी त्यांना रस्ता रिकामा करण्याचे आवाहन केले. परंतु, त्यांनी माघार घेतली नाही उलट पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला आणि अनेकांना अटक केले आहे. या प्रकरणात पुढील कारवाई सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे ही वाचा : 

फरार शातिर ठगाला जम्मू-कश्मीरच्या सोपोरमध्ये अटक

भारताचा वास्तविक जीडीपी वृद्धीदर २६ मध्ये ६.७ टक्के राहणार

पोटासाठीच नाही, ‘इम्युनिटी बूस्टर’सुद्धा आहे ‘पंचकोल’

“जन्म प्रमाणपत्र घोटाळा: ५०,००० जन्म प्रमाणपत्रे आणि ४७,००० आधार कार्ड रद्द”

दरम्यान, अहिल्यानगर शहरात दुर्गामाता दौडच्या स्वागतासाठी रस्त्यावर ‘आय लव्ह मोहम्मद’ नामक रांगोळी काढून त्यावरून दुर्गा माता दौड काढण्याचा प्रयत्न केला गेला. माळीवाडा परिसरातील बारा तोटी कारंजा येथे ही आज घटना घडली. या घटनेमुळे मुस्लीम समाजाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत रस्ता रोको आंदोलन केलं.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा