भाजपचे आमदार राम कदम यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत-पाकिस्तान युद्धविराम दाव्यावर ‘दाल में कुछ काला है’ अशी प्रतिक्रिया दिली होती. या वक्तव्यावर राम कदम यांनी पलटवार करत ते पाकिस्तानातील दहशतवाद्यांना आनंद देणारे वक्तव्य असल्याचं म्हटलं आहे. कदम म्हणाले, “राहुल गांधी यांच्या गेल्या काही वर्षांतील वक्तव्यांकडे पाहिलं, तर वाटतं की जणू त्यांनी दहशतवाद्यांना खूश ठेवण्याची सुपारी घेतली आहे. ते नेहमीच अशी विधानं करतात, जी दहशतवाद्यांच्या मनाला सुखावणारी असतात.”
राहुल गांधींना सल्ला देताना राम कदम म्हणाले, “आपण भारतमातेचे सुपुत्र आहात, कधी विचार केला का की तुमच्या या विधानामुळे आपले सैनिक, पहलगाममधील हल्ल्यात अपघाताने मृत्यू पावलेल्यांचे कुटुंबीय काय अनुभवत असतील? राहुल गांधी विचार न करता बोलतात. त्यांना दहशतवाद्यांना खुश करण्यातच समाधान वाटतं. राम कदमांनी असा आरोप केला की, राहुल गांधी विदेश दौऱ्यांमध्ये नेहमी भारताविरुद्ध बोलतात. “काँग्रेसमध्ये राहुल गांधी हे अशा नेत्यांपैकी आहेत, जे कायम लहान मुलांसारखं बोलतात,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा..
सांगली ड्रग्स फॅक्टरी प्रकरण : केमिकल पुरवठादाराला गुजरातमधून केली अटक
पाकिस्तानी पासपोर्ट अजूनही सर्वात दुर्बल
RSS ची अधिकारी असल्याचे सांगत महिलेचा भाजप नेत्याला ४१ लाखांचा गंडा!
जो लालचामुळं धर्मांतर करतो, तो देशही विकू शकतो
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना राम कदम म्हणाले की, “ते केवळ चर्चेत राहण्यासाठी अशी विधाने करतात. आम्ही प्रत्येक व्यासपीठावर उत्तर देण्यास तयार आहोत. निवडणूक आयोगावर ‘सामना’ मध्ये केलेल्या टीकेवर, त्यांनी सांगितले की, “UBT (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे स्वतःचे लोक त्यांच्यापासून दुरावले आहेत. हे लोक केवळ चर्चेत राहण्यासाठी भाजपा नेत्यांवर टीका करतात. निवडणुका जिंकल्या की आयोग चांगला वाटतो, आणि हरल्यावर तोच आयोग वाईट ठरतो – ही दुहेरी भूमिका योग्य नाही.
सांगलीतील टॉयलेट व्हिडिओ व मारहाणीच्या घटनेवर, राम कदम म्हणाले की, “हा व्हिडिओ अत्यंत दुर्दैवी आहे. हिंदुत्वाच्या नावाने संघटना चालवणारे लोक, भाषेच्या कारणावरून आपल्या हिंदू भावालाच मारतात. हे तुमचं हिंदुत्व आहे का? कोणत्याही धर्म, जातीच्या व्यक्तीला मारण्याचा अधिकार कुणालाही नाही. तेजस्वी यादव यांच्यावरही टीका करताना, त्यांनी म्हटलं की, “जेव्हा निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम, आयोग योग्य वाटतो. कर्नाटकमध्ये विजय मिळाल्यावर प्रश्न नाहीत. तेलंगणामध्येही नाही. पण जिथे पराभव दिसतो, तिथे लगेच आयोगावर आणि यंत्रणेवर आरोप सुरू होतात. ही दुटप्पी भूमिका लोकशाहीसाठी योग्य नाही.”
मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर, राम कदम म्हणाले की, “आपली न्यायव्यवस्था पुराव्यांच्या आधारे निर्णय घेते. यामध्ये उशीर झाला आहे, आणि उच्च न्यायालयातून न्याय न मिळाल्याने सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आले आहे. शेवटी, राम कदम म्हणाले की, तेजस्वी यादव यांची भूमिका स्पष्ट दाखवते की ते आधीच पराभवाची भीती बाळगून कारणं तयार करत आहेत. निवडणुकांमध्ये हार-जीत सामान्य गोष्ट आहे, परंतु आधीच आयोग व यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करणे हे केवळ त्यांच्या बिथरलेपणाचे लक्षण आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, पण अशा भूमिका योग्य नाहीत.







