25 C
Mumbai
Friday, January 30, 2026
घरविशेषविश्व पटलावर हिंदीचा वाढता सन्मान हा अभिमानाची बाब

विश्व पटलावर हिंदीचा वाढता सन्मान हा अभिमानाची बाब

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हिंदी दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आणि जगभरात हिंदीबद्दल वाढत चाललेला सन्मान हा सर्व भारतीयांसाठी अभिमान आणि प्रेरणेचा विषय असल्याचे म्हटले. दरवर्षी १४ सप्टेंबरला साजरा होणारा हिंदी दिवस हा हिंदीला भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक म्हणून स्वीकारण्याच्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून देतो. १९४९ मध्ये संविधान सभेने संविधानाच्या प्रारूप तयार करताना अधिकृत भाषेच्या चौकटीवर सर्वसंमती दिली होती.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले, “आपल्या सर्वांना हिंदी दिनाच्या अनंत शुभेच्छा. हिंदी ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर आपली ओळख आणि संस्कारांची जिवंत परंपरा आहे.” देशवासीयांना प्रादेशिक भाषा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करताना त्यांनी म्हटले, “या प्रसंगी आपण सर्वांनी मिळून हिंदीसह सर्व भारतीय भाषा समृद्ध करण्याचा आणि त्या भावी पिढ्यांपर्यंत अभिमानाने पोहोचवण्याचा संकल्प करु या.”

हेही वाचा..

पलामूत सुरक्षादलाकडून ५ लाखांचा इनामी नक्षलवादी ठार

पंतप्रधान मोदी करणार १८,५३० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

डीआरआयकडून २६ कोटींचे अमली पदार्थ जप्त

पुण्यात दर्ग्याच्या खाली सापडले भुयार

मोदी पुढे म्हणाले, “विश्व पटलावर हिंदीचा वाढता सन्मान हा आपणा सर्वांसाठी अभिमान आणि प्रेरणेचा विषय आहे.” केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनीही हिंदी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले, “निज भाषा उन्नती अहै, सब उन्नती को मूल। बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल। सर्वांना हिंदी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”

ते पुढे म्हणाले, “हिंदी ही केवळ एक भाषा नसून भारतीय संस्कृतीचे अद्वितीय प्रतीक आहे. ती भारतीय संस्कार, जीवनमूल्ये आणि आदर्शांची प्रभावी वाहक आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात देशाला एकतेच्या सूत्रात बांधण्यात हिंदीचा वाटा अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. देशातील विविध भाषांसोबत हिंदी भाषा राष्ट्रनिर्मितीत आपला सहभाग निश्चितपणे देत राहील.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा