पुण्याच्या आंबेगावमधील मंचर शहरात दर्ग्याचा भाग कोसळून भुयार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांनी घटनास्थळी धाव घेत सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. तसेच या दर्ग्याच्या खाली मंदिर असावे अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
पुण्यातील मंचर शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्याचे काम सुरू असताना एका दर्ग्याचा काही भाग कोसळला. त्यानंतर खाली एक भुयार दिसून आले. यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घटनास्थळी धाव घेत तपास करण्याची मागणी केली आहे. तर, मुस्लीम संघटनांनी दर्ग्याच्या नुकसानीबद्दल आक्षेप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींनी बैराबी-सैरांग रेल्वे मार्गाचे केले उद्घाटन !
पाकिस्तानातील लष्करी ताफ्यावर हल्ला करून १२ जवान मारले!
भारत-पाकिस्तान सामना पाहू नका, टीव्ही बंद ठेवा!
घाटकोपरमध्ये कार फुटपाथवर चढली; कार चालक तरुणी पोलिसांच्या ताब्यात
या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमले होते. दरम्यान पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त केला. इथे भुयारासारखी रचना आढळल्यानंतर जेसीबी लावून खोदकामही करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिसरात फौजफाटा वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली. हिंदू संघटनांनी या दर्ग्याच्या खाली मंदिर असण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मुस्लीम समुदायाने हा दर्गा शेकडो वर्षापूर्वींचा असल्याचा दावा केला आहे.







