28 C
Mumbai
Monday, February 2, 2026
घरविशेषऑपरेशन सिंदूरमध्ये ‘संभव’ची महत्त्वाची भूमिका; काय आहे संभव मोबाइल?

ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘संभव’ची महत्त्वाची भूमिका; काय आहे संभव मोबाइल?

Google News Follow

Related

भारतीय सैन्याने पाकिस्तान विरुद्ध राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशात विकसित केलेल्या सुरक्षित मोबाइल इकोसिस्टमचा वापर संवादासाठी केला होता. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या लक्ष्यांवर हल्ला होत असताना सैन्य कसे संवाद साधत होते हे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी उघड केले आहे. जनरल द्विवेदी यांनी सांगितले की भारतीय सैन्याने देशात विकसित केलेल्या सुरक्षित मोबाइल इकोसिस्टमचा वापर संवादासाठी केला. त्याला ‘संभव’ (सिक्योर आर्मी मोबाइल भारत वर्जन) म्हणतात. लष्कर प्रमुखांनी सांगितले की या संभव फोनचा वापर ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता जेणेकरून कोणतीही गुप्त माहिती बाहेर प्रसिद्ध होऊ नये.

सैन्यातील कमांड आणि संभाषणात यापूर्वीच संभव फोन वापरला जात होता. ऑपरेशन सिंदूर वेळी या फोनचा वापर झाला. संयुक्त ऑपरेशन्स आणि गुप्तचर मोहिमांमध्ये सर्व कमांडर एकाच प्लॅटफॉर्मवर जोडलेले होते. लष्कर प्रमुखांनी सांगितले की आता या यंत्रणेला आणखी अपग्रेड केले जात आहे.

हे ही वाचा : 

नेपाळमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर २७ जणांना अटक; शस्त्रे जप्त

झारखंड येथून आयसिसचा संशयित दहशतवादी अटकेत!

नेव्ही नगरातून इन्सास रायफल चोरलेले दोघे भाऊ तेलंगणातून अटकेत

ट्रम्प म्हणतात, प्रिय मित्र मोदींशी बोलायची इच्छा; पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनशी झालेल्या चर्चेत भारतीय सैन्याने संभव स्मार्टफोनचा वापर केला होता. नंतर, सुरक्षित संवादासाठी सीमेवर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना ३० हजार संभव फोन देण्यात आले. याद्वारे सैन्य अधिकारी महत्त्वाची माहिती शेअर करतात. या मोबाइलमध्ये एम-सिग्मा सारखी यंत्रणा असून याद्वारे व्हाट्सअपसारखे मेसेज, फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येतात. तसेच संभव फोनमध्ये अधिकाऱ्यांना कोणताही नंबर सेव्ह करण्याची आवश्यकता नसून सर्व आवश्यक नंबर फोनमध्ये आधीच उपलब्ध आहेत. हा फोन 5G तंत्रज्ञानावर काम करतो आणि पूर्णपणे एन्क्रिप्टेड आहे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर सारख्या महत्त्वाच्या मोहिमांमध्ये या मोबाइलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा