27 C
Mumbai
Friday, April 17, 2026
घरविशेषनेपाळच्या तुरुंगातून फरार झालेले ५ कैदी भारतात घुसण्याचा प्रयत्न करताना अटकेत!

नेपाळच्या तुरुंगातून फरार झालेले ५ कैदी भारतात घुसण्याचा प्रयत्न करताना अटकेत!

सशस्त्र सीमा बलाची कारवाई

Google News Follow

Related

नेपाळमधील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. निदर्शकांचा राग शांत होण्याचे नाव घेत नाहीये. नेपाळमधील १८ जिल्ह्यांतील तुरुंगातून सुमारे ६ हजार कैदी पळून गेले आहेत. दरम्यान, नेपाळच्या तुरुंगातून पळून गेलेल्या ५ कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात घुसखोरीचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. तथापि, हे घुसखोर त्यांच्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत आणि त्यांना अटक करण्यात आली आहे.

नेपाळच्या तुरुंगातून पळून गेलेल्या पाच कैद्यांना सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) अटक केली आहे. सिद्धार्थनगर परिसरातील भारत-नेपाळ सीमेवर ही अटक करण्यात आली. एसएसबीच्या जवानांनी संशयास्पद हालचाल पाहून या पाचही व्यक्तींना थांबवून तपासणी केली असता, ते नेपाळमधील तुरुंगातून पळून आलेले कैदी असल्याचे उघड झाले. अटकेनंतर या सर्व कैद्यांना पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘संभव’ची महत्त्वाची भूमिका; काय आहे संभव मोबाइल?

नेपाळमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर २७ जणांना अटक; शस्त्रे जप्त

नेपाळ हिंसाचार : तुरुंगातून ६ हजार कैदी फरार!

काँग्रेस आमदार सतीश कृष्णा साईल यांना अटक!

या घटनेमुळे नेपाळमधील तुरुंग व्यवस्थेवर तसेच दोन्ही देशांच्या सीमावर्ती सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून सीमा भागात गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, नेपाळ मधील परिस्थिती अत्यंत निकट आहे. पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्यानंतर सुरक्षा दलाने देशाची कमान हाती घेतली आहे. सुरक्षा दलाकडून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, आंदोलक शांत होण्याचे नाव घेत नाहीयेत. यावेळी त्यांनी पुन्हा निदर्शने करून विविध मागण्या समोर ठेवल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा