29.1 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरविशेषकचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला, २० जण अडकले

कचऱ्याचा ढिगारा इमारतीवर कोसळला, २० जण अडकले

पिंपरी चिंचवडची घटना, बचावकार्य युद्धपातळीवर

Google News Follow

Related

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान बुधवारी (८ जुलै) पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली. मोशी परिसरातील एका इमारतीचा भाग अचानक कोसळल्याने सुमारे २० जण ढिगाऱ्याखाली अडकले. यातील पाच लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी (Waste-to-Energy) प्रकल्पातील प्रशासकीय इमारतीत घडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याच्या मोठ्या ढिगाऱ्याला घसरण झाली आणि त्याचा जोर इमारतीवर पडल्याने इमारतीचा भाग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, दुर्घटनेचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, राष्ट्रीय आणि स्थानिक आपत्ती प्रतिसाद पथके, पोलिस तसेच महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जेसीबी आणि इतर जड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

हे ही वाचा:

इराणबरोबरचा युद्धविराम संपला!

दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात मोठा भूकंप

शोपियान मध्ये ‘लष्कर’च्या टॉप कमांडरला घातल्या गोळ्या

गुजरातवरून चरफडणाऱ्यांना चपराक, महाराष्ट्रात येणार नर्मदेचे १० टीएमसी पाणी

ढिगाऱ्याखाली २० जण अडकल्याची प्राथमिक माहिती असून पाच जणांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमी किंवा मृतांचा अधिकृत आकडाही जाहीर करण्यात आलेला नसून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांत पाणी साचणे, भूस्खलन, वाहतुकीवर परिणाम आणि नागरिकांचे स्थलांतर अशा घटना घडत आहेत. अतिवृष्टीमुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा