28.6 C
Mumbai
Sunday, July 12, 2026
घरविशेषनेपाळ हिंसाचार : तुरुंगातून ६ हजार कैदी फरार!

नेपाळ हिंसाचार : तुरुंगातून ६ हजार कैदी फरार!

निदर्शकांकडून अजूनही निदर्शने सुरूच 

Google News Follow

Related

सरकारविरुद्ध जनरल-जी निदर्शनानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे नेपाळमधील परिस्थिती बिकट झाली आहे. आतापर्यंत २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो जखमी झाले आहेत. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतरही निदर्शकांचा राग कमी झालेला नाही आणि निदर्शक त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत.

नेपाळमध्ये अनेक ठिकाणी इमारती जळालेल्या अवस्थेत दिसत आहेत. निदर्शकांनी अनेक सरकारी कार्यालये आणि त्यात ठेवलेली महत्त्वाची कागदपत्रे उद्ध्वस्त केली आहेत. अशा परिस्थितीत, नेपाळमधील लष्कराने आता कमान आपल्या हाती घेतली आहे आणि संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे.

१८ जिल्ह्यांतील तुरुंगातून सुमारे ६ हजार कैदी फरार
नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, एक मोठी बातमी अशी आहे की नेपाळमधील १८ जिल्ह्यांमधील तुरुंगातून सुमारे ६ हजार कैदी पळून गेले आहेत. यापैकी ७७३ कैदी एकट्या कास्कीमधून आणि ५०० कैदी नवलपरासी तुरुंगातून पळून गेले आहेत. ७०० कैदी चितवनमधून, ६१२ कैदी कैलालीमधून, ५७६ कैदी जलेश्वरमधून पळून गेले आहेत.

नेपाळच्या या तुरुंगांमधून पळून गेलेल्या कैद्यांची यादीही समोर आली आहे. अशा परिस्थितीत, पळून गेलेले कैदी देशाच्या सुरक्षेत अडथळा ठरू शकतात. फरार कैद्यांना पकडणे ही सुरक्षा दलापुढे मोठी डोके दुखी ठरणार आहे.  दरम्यान, नेपाळ अजून अशांत असून सुरक्षा दलांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षा दलाने संध्याकाळी ५ नंतर देशभरात कर्फ्यूची घोषणा केली आहे. 

 

हे ही वाचा : 

काँग्रेस आमदार सतीश कृष्णा साईल यांना अटक!

महिलेचे बळजबरीने धर्मांतर करून केला निकाह; तिघांना ठोकल्या बेड्या

नेव्ही नगर रायफल चोरी : नक्षलवाद्यांशी कनेक्शन!

‘संविधान पुनर्लेखन करा, ३ दशकांच्या लुटीची चौकशी करा’

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा