28.9 C
Mumbai
Friday, July 10, 2026
घरविशेषमुंबईतील प्रसिद्ध ‘के रुस्तम’ आइसक्रीम ब्रँडचे फूड लायसन्स निलंबित

मुंबईतील प्रसिद्ध ‘के रुस्तम’ आइसक्रीम ब्रँडचे फूड लायसन्स निलंबित

एफडीएची मोठी कारवाई

Google News Follow

Related

मुंबईतील चर्चगेट परिसरात असलेल्या तब्बल ८० वर्षांहून अधिक जुन्या आणि प्रसिद्ध ‘के रुस्तम’ या आइसक्रीम ब्रँडवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएने या प्रतिष्ठानचे फूड लायसन्स निलंबित केले असून, तात्काळ प्रभावाने व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेबॉर्न स्टेडियमजवळ असलेले ‘के रुस्तम’ हे आपल्या प्रसिद्ध आइसक्रीम सँडविचसाठी देश-विदेशात ओळखले जाते. मात्र, एफडीएच्या अचानक करण्यात आलेल्या तपासणीत अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या. एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या ‘झिरो टॉलरन्स’ मोहिमेअंतर्गत मुंबईतील प्रमुख खाद्य प्रतिष्ठानांची स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांची तपासणी सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

तपासणीदरम्यान अन्नपदार्थ तयार करण्याच्या आणि हाताळण्याच्या विभागात स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच दुग्धजन्य पदार्थ साठवण्यासाठी आवश्यक असलेल्या तापमान आणि रेफ्रिजरेशनच्या निकषांचे पालन करण्यात आले नव्हते. त्यामुळे अन्नपदार्थ खराब होण्याचा आणि त्यामध्ये जीवाणू वाढण्याचा धोका असल्याचे एफडीएने नमूद केले.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के; लातूरसह अनेक जिल्ह्यांत हादरे

सरकारी नोकरी, संपत्तीच्या लालसेपोटी मुलीनेच रचला आईच्या हत्येचा कट

“भारत-पाक युद्ध अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते” ट्रम्प यांचा पुन्हा युद्ध थांबवल्याचा दावा

शांतता करार संपल्याच्या घोषणेनंतर अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले

याशिवाय अनेक खाद्यपदार्थांवर अनिवार्य लेबल, उत्पादनाची तारीख, बॅच क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती नमूद करण्यात आलेली नव्हती. तसेच आइसक्रीम तयार करणाऱ्या आणि ग्राहकांना देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कायद्यानुसार आवश्यक असलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रही उपलब्ध नसल्याचे तपासात आढळून आले.

या सर्व गंभीर त्रुटी लक्षात घेऊन एफडीएने ‘के रुस्तम’चे फूड लायसन्स निलंबित करत प्रतिष्ठान तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व त्रुटी दूर करून अन्न सुरक्षा नियमांचे पूर्ण पालन झाल्याची खात्री झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा