33 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरविशेषचित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणारा 'द काश्मीर फाइल्स' लवकरच या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणारा ‘द काश्मीर फाइल्स’ लवकरच या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Google News Follow

Related

सध्या देशभरात चर्चेत असणारा ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ११ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने २५ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यानंतर आपले अश्रू अनावर झाले आहेत. देशभरातील बहुतांश चित्रपट गृहांमध्ये या चित्रपटाचे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. तर परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

बॉक्स ऑफिसवर कमाई करणारा हा चित्रपट आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी- 5 या ओटीटी प्लॅटफोर्मवर जवळपास एक महिन्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होईल.  या चित्रपटाला सुरुवातीला जास्त स्क्रीन्स आणि शो मिळाले नव्हते. त्यासोबतच सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ चित्रपटाची या चित्रपटाला स्पर्धा होती. त्यासोबतच अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ आणि आलिया भटचा ‘गंगुबाई काठियावाडी’ची पण स्पर्धा होती. तरीदेखील प्रेक्षकांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट उचलून धरला. त्यामुळेच या चित्रपटाचे शो वाढवणे भाग पडले.

हे ही वाचा:

डहाणू महोत्सवाने दिला स्थानिकांना आर्थिक हातभार

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला!

फडणवीसांनी फोडला दुसरा बॉम्ब! ‘न्यूज डंका’ च्या हाती एक्सक्ल्युझिव्ह ध्वनिफीत

नाटोच्या इतर देशांना झेलेन्स्की यांनी दिला सतर्कतेचा इशारा

विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री पल्लवी जोशी, अनुपम खेर, प्रकाश बेलवाडी, मिथुन चक्रवर्ती, भाषा सुंबळी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वी सरनाविक यांनी काम केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा